पुणे, ता. 28 - गेल्या बुधवारी सकाळी येथे बस पळवून सुमारे 27 लोकांना जखमी करणाऱ्या त्या बसचालकाची रवानगी 1 फेब्रुवारीपर्यंत येरवडा वेड्यांच्या रुग्णालयात करण्यात आली आहे. स्थानिक न्यायालयाने पोलिसांना संबंधित बसचालक संतोष माने याला वेड्यांच्या रुग्णालयात निरीक्षणासाठी पाठविण्याबाबत निर्देश दिले आहेत. माने याने मास्टर-की च्या सहाय्याने स्वारगेट बस स्थानकावरून बस पळवून नेली होती. यानंतर त्याने पादचारी मार्गासह, विरुद्ध दिशेने बस चालवून अनेकांना जखमी केले तर या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला, काही वाहनांचे नुकसान झाले होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.