मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2026 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आखाड्यातील हिऱ्यांना मिळाला आधाराचा हात: मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 'पैलवान दत्तक योजने'चा शुभारंभ

मुंबई, दि. २१ : महाराष्ट्राच्या मातीने देशाला असंख्य मल्ल दिले; मात्र गरिबीमुळे अनेक गुणी पैलवानांची स्वप्ने आखाड्याबाहेरच थांबली. हीच परंपरा मोडून काढण्याचा निर्धार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त युनायटेड रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (यु डब्ल्यू एफ आय) आणि देवाभाऊ केसरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या 'पैलवान दत्तक योजना २०२६–२७' या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मंगळवारी मलबार हिल येथील सेवा सदन बंगल्यावर शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील ११ होतकरू पैलवानांना दत्तक घेत त्यांना शिष्यवृत्ती, मानधन आणि क्रीडा साहित्याचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्राच्या कुस्तीला नवे बळ देणाऱ्या या उपक्रमामुळे आर्थिक अडचणींमुळे मागे पडणाऱ्या प्रतिभावान मल्लांच्या स्वप्नांना आता भक्कम आधार मिळणार आहे. या ११ मल्लांवर विश्वासाची मोहोर या योजनेत सोहम सुनील कुंभार, ज्ञानवी अर्जुन पाटील, संग्राम नितीन खुर्द, रणवीर समिंदर जाधव, श्रीकर भास्कर नायकवडी, वैष्णवी शंकर पाटील, वीरेन...

सिडको: आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील ८,७९५ सदनिकांकरिता संगणकीय सोडत संपन्न

 सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर - माझा फर्स्ट चॉइस” गृहनिर्माण योजनेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील ८,७९५ सदनिकांकरिता संगणकीय सोडत संपन्न   सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर - माझा फर्स्ट चॉइस” गृहनिर्माण योजनेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या ८,७९५ सदनिकांची संगणकीय सोडत सोमवार, दि. २० जुलै २०२६ रोजी सिडको भवन, सीबीडी बेलापूर येथे श्री. अश्विन मुद्गल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी श्री. शान्तनु गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक; डॉ. राजा दयानिधी, सहव्यवस्थापकीय संचालक; श्री. सुरेश मेंगडे, मुख्य दक्षता अधिकारी; श्री. नरेंद्र भामरे, संचालक (आयटी), एनआयसी; श्रीमती हबीबा ए. एल., उपसंचालक (आयटी), एनआयसी; श्री. श्रीनिवास मोकळीकर, (प्र.) महाव्यवस्थापक (गृहनिर्माण) तसेच सिडकोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना श्री. अश्विन मुद्गल यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना हक्काची घरे उपलब्ध करून देण्याचे  सिडकोचे लक्ष्य असून, उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नामांकित  कंपन्या...

सिडकोची ऑनलाईन संगणकीय सोडत २० जुलैस

  सिडकोतर्फे डिसेंबर २०२५ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या गृहनिर्माण योजनेची ऑनलाईन संगणकीय सोडत सोमवारी २०.०७.२०२६ रोजी काढण्यात येणार आहे. सदर गृहनिर्माण योजनेअंतर्गत नवी मुंबईतील विविध नोड्समध्ये १६,८७६ सदनिका (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) – ८,७९५ व अल्प उत्पन्न गट (LIG) – ८,०८१) उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या योजनेसाठी एकूण १९,५४८ अर्ज प्राप्त झाले आहेत. तथापि, मा. उच्च न्यायालयाने रिट याचिका क्र. २६५० / २०२६ मध्ये दिनांक २५.०३.२०२६ रोजी दिलेल्या अंतरिम आदेशाच्या अनुषंगाने, सदर संगणकीय सोडत केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवर्गातील ८,७९५ सदनिकांसाठी घेण्यात येणार आहे. या प्रवर्गासाठी एकूण १०,८३२ अर्ज प्राप्त झाले आहेत. सदर सोडत पूर्णपणे पारदर्शक व संगणकीकृत पद्धतीने घेण्यात येईल. सोडत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यशस्वी अर्जदारांची यादी सिडकोच्या अधिकृत गृहनिर्माण संकेतस्थळावर www.cidcohomes.com येथे प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी अर्जदारांच्या यादीत नाव समाविष्ट झाल्याने संबंधित अर्जदारास त्या सदनिकेवर कोणताही कायदेशीर हक्क अथवा दावा आपोआप प्राप्त होणार नाही. सदनिकेचे अ...

१३ जुलैपासून बेलापूर–पेंधर मेट्रो प्रवासाचा कालावधी कमी

 १३ जुलै २०२६ पासून बेलापूर–पेंधर मेट्रो प्रवासाचा कालावधी १ मिनिट ३० सेकंदांनी कमी होत आहे. सोमवार, दिनांक १३ जुलै २०२६ पासून सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. १ वरील बेलापूर–पेंधर दरम्यानच्या मेट्रो सेवेचे सुधारित वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे.  मेट्रो संचालनाचे अधिक कार्यक्षम नियोजन केल्यामुळे प्रत्येक एकेरी प्रवासाचा कालावधी १ मिनिट ३० सेकंदांनी कमी होणार असल्याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी असे, सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी कळवले आहे.

जि. प. शिक्षकांचा भार महापालिकेवर नको: कांतीलाल कडू

  (पनवेल, ता. ११): पनवेल महापालिकेच्या हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांचे महापालिकेकडे वर्गीकरण करताना त्या शाळांमधील शिक्षकांना महापालिकेच्या सेवेत समाविष्ट करू नये, अशी मागणी लोकमुद्रा जनहित पार्टीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शिक्षकांचे वर्गीकरण झाल्यास महापालिकेवर शेकडो कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडू शकतो, असा दावा त्यांनी केला आहे.  पनवेल महापालिका क्षेत्रात रायगड जिल्हा परिषदेच्या ५१ शाळा असून, त्यामध्ये सुमारे ६,९९५ विद्यार्थी आणि २६५ शिक्षक कार्यरत आहेत. या शाळा महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे वर्ग करण्याबाबत प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, शाळांसोबत शिक्षकांचाही समावेश करण्याच्या हालचाली सुरू असल्याबद्दल कडू यांनी आक्षेप नोंदविला आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार शिक्षकांचे समायोजन करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकांचा भार महापालिकेवर टाकणे योग्य ठरणार नाही. अनेक शिक्षक निवृत्तीच्या उंबरठ्यावर असल्यान...

सिडकोच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकपदी अश्विन मुद्गल

 सिडको महामंडळाच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे अश्विन मुद्गल यांनी १७ जून २०२६ रोजी स्वीकारली. सिडकोचे मुख्य कार्यालय असलेले सिडको भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे श्री. अश्विन मुद्गल यांनी उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे स्वीकारली. सिडकोच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती होण्यापूर्वी ते एमएमआरडीए महामंडळात अतिरिक्त महानगर आयुक्त म्हणून कार्यरत होते. सन २००७ च्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी असलेल्या श्री. अश्विन मुद्गल यांनी आपल्या प्रशासकीय सेवेची सुरूवात नाशिक जिल्ह्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून केली. त्यानंतर पंढरपूर-सोलापूर येथे उपजिल्हादंडाधिकारी, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा व यवतमाळयेथे जिल्हाधिकारी, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त, नागपूर इम्प्रूव्हमेन्ट ट्रस्टचे अध्यक्ष आणि नागपूरचेअतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळले आहेत. श्री. अश्विन मुद्गल हे वाणिज्यिक शाखेचे पदवीधर आहेत. “सिडको हे देशातील अग्रगण्य नियोजन व विकास महामंडळांपैकी एक असून, सिडकोतर्फे राबविण्...

मार्चमध्ये पनवेल येथे चौथे राज्यव्यापी साहित्य संमेलन: कवी, गजलकारांना सहभागी होण्याचे संस्थांचे आवाहन

 पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. याकरिता सहभागी होऊ इच्छिणाऱ्या राज्यातील नामवंत कवी, गजलकारांनी आपल्या स्वरचित कविता, गजल २० फेब्रुवारीपर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन कांतीलाल प्रतिष्ठान रायगड आणि विश्वव्यापी मराठी साहित्य, सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केले आहे. अभिजात मराठी भाषेच्या जतनाकरिता गेली अनेक वर्षे दोन्ही संस्था कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली कवी संमेलने, गजल मुशायरा, चर्चासत्रांपासून मराठी भाषेचा गोडवा वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सकाळी वारकरी दिंडीतून ‘ज्ञानोबा-तुकोबा’ यांच्या गजरासह ग्रंथ दिंडीत टाळ, चिपळ्या, तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन पारंपरिक पद्धतीने नयनरम्य पालखी काढण्यात येईल. या परंपरेच्या माध्यमातून पनवेल शहराचे साहित्य, संस्कृती आणि सांस्कृतिक वारसा जतन केला जात आहे. सकाळी दिंडी, उद्घाटन सोहळा, एक-एक तासाच्या अवधीची दोन चर्चासत्रे, कवी आख्यान, गजल मुशायरा याशिवाय अन्य ...