सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर - माझा फर्स्ट चॉइस” गृहनिर्माण योजनेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील ८,७९५ सदनिकांकरिता संगणकीय सोडत संपन्न
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर - माझा फर्स्ट चॉइस” गृहनिर्माण योजनेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल
घटकाच्या ८,७९५ सदनिकांची संगणकीय सोडत सोमवार, दि. २० जुलै २०२६ रोजी सिडको भवन, सीबीडी
बेलापूर येथे श्री. अश्विन मुद्गल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांच्या हस्ते संपन्न झाली.
यावेळी श्री. शान्तनु गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक; डॉ. राजा दयानिधी, सहव्यवस्थापकीय संचालक; श्री. सुरेश मेंगडे, मुख्य दक्षता अधिकारी; श्री. नरेंद्र भामरे, संचालक (आयटी), एनआयसी; श्रीमती हबीबा ए. एल., उपसंचालक (आयटी), एनआयसी; श्री. श्रीनिवास मोकळीकर, (प्र.) महाव्यवस्थापक (गृहनिर्माण) तसेच सिडकोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना श्री. अश्विन मुद्गल यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना हक्काची घरे उपलब्ध करून देण्याचे सिडकोचे लक्ष्य असून, उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नामांकित कंपन्यांकडून तयार करण्यात आलेला आराखडा यांमुळे सिडकोची घरे गुणवत्तापूर्ण असल्याचे प्रतिपादन केले.प्रवर्गातील सदनिकांची सोडत मा. उच्च न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत स्थगित ठेवण्यात आली आहे याची
कृपया अर्जदारांनी नोंद घ्यावी.डिसेंबर २०२५ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या योजनेंतर्गत तळोजा, कळंबोली, खारघर, उलवे व खारकोपर
येथे ८,७९५ ईडब्ल्यूएस सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या असून त्यासाठी १०,८३२ अर्ज प्राप्त झाले
होते. सोडत पूर्णतः पारदर्शक व मानवी हस्तक्षेपविरहित पद्धतीने पार पडली असून यशस्वी अर्जदारांची यादी
www.cidcohomes.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे
