मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

भारतीय संघ विश्वचषक स्पर्धा-उपांत्यफेरी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

भारतीय संघ विजयाच्या रंगात रंगलाः रंगपंचमीचा पंच

गुरुवारी (ता. 24 मार्च) अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघात अक्षरशः करो या मरो..प्रमाणे जबरदस्त चुरशीच्या ठरलेल्या विश्वचषक सामन्यात अखेर भारतीय संघाच्या संयमी खेळीने संघाने देशातील नागरिकांना रंगपचमीनिमित्त विजयाची भेट दिली. काही षटकांमुळे श्वास रोखलेल्या प्रेक्षकांना आणि इलेक्ट्रॉनिक वाहिनीवर हा सामना पाहणाऱ्यांचे श्वास रोखून धरले होते. परंतू युवराज सिंग आणि सुरेश रैना हे दोघेही विजयाचे शिल्पकार ठरले. युवराजसिंग याला सामनावीर घोषित करण्यात आले. प्रेक्षकांना अपेक्षित यश मिळवून देऊन कांगारूंच्या संघाला रंगपंचमीचा पंच मारून हम भी कुछ कम नही...हे दाखवून दिले. पाच गडी आणि 14 चेंडू राखून भारताने कांगारूंवर विजय मिळवला. रंगपंचमी जणू काही दिवाळी... आजच्या महत्वपूर्ण सामन्याची विजयीपताका रोवण्यासाठी पंधरा धावांची आवश्यकता असतानाच भारताने विजय मिळवल्यासारखेच चित्र स्पष्ट झाल्यामुळे देशातील अनेक शहरांमध्ये आतषबाजी करण्यात आली. सामना संपल्यानंतर बराच वेळ ठिकठिकाणी आतषबाजी सुरूच होती, जणूकाही दिवाळीच साजरी करण्यात येत असल्याचा भास होत होता. विश्वचषकाचा गतविजेता आणि यंदाही प्रबळ...