गुरुवारी (ता. 24 मार्च) अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघात अक्षरशः करो या मरो..प्रमाणे जबरदस्त चुरशीच्या ठरलेल्या विश्वचषक सामन्यात अखेर भारतीय संघाच्या संयमी खेळीने संघाने देशातील नागरिकांना रंगपचमीनिमित्त विजयाची भेट दिली. काही षटकांमुळे श्वास रोखलेल्या प्रेक्षकांना आणि इलेक्ट्रॉनिक वाहिनीवर हा सामना पाहणाऱ्यांचे श्वास रोखून धरले होते. परंतू युवराज सिंग आणि सुरेश रैना हे दोघेही विजयाचे शिल्पकार ठरले. युवराजसिंग याला सामनावीर घोषित करण्यात आले. प्रेक्षकांना अपेक्षित यश मिळवून देऊन कांगारूंच्या संघाला रंगपंचमीचा पंच मारून हम भी कुछ कम नही...हे दाखवून दिले. पाच गडी आणि 14 चेंडू राखून भारताने कांगारूंवर विजय मिळवला.
रंगपंचमी जणू काही दिवाळी...
आजच्या महत्वपूर्ण सामन्याची विजयीपताका रोवण्यासाठी पंधरा धावांची आवश्यकता असतानाच भारताने विजय मिळवल्यासारखेच चित्र स्पष्ट झाल्यामुळे देशातील अनेक शहरांमध्ये आतषबाजी करण्यात आली. सामना संपल्यानंतर बराच वेळ ठिकठिकाणी आतषबाजी सुरूच होती, जणूकाही दिवाळीच साजरी करण्यात येत असल्याचा भास होत होता. विश्वचषकाचा गतविजेता आणि यंदाही प्रबळ दावेदार म्हणून ज्या संघाकडे पाहिले जात होते अशा ऑस्ट्रेलिया संघाला आता बाहेर जावे लागल्यामुळे यंदाच्या विश्वचषकाचा दावेदार म्हणून भारताकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान मोहाली येथे उपांत्यफेरी खेळली जाणार असून भारतीय संघावर या सामन्यात बराच दबाव असेल अशी प्रतिक्रिया क्रणधार महेंद्रसिंग धोनी यांनी व्यक्त केली.