क्रमांक एक चा विश्वविख्यात क्रिकेटपटू होऊन देखील आपल्या साध्या राहणी, सुशील स्वभावाची ख्याती प्राप्त केलेला अनेक चाहत्यांचा सुपरहिरो सचिन तेंडुलकर आपल्या शंभर धावांची शंभरी अर्थात शतकांचे शतक गाठण्यापासून केवळ दोन पावले दूर आहे.
आजतागायत सचिनने कसोटी सामन्यांमध्ये एकूण ५१ शतके झळकावली असून एक दिवसीय सामन्यांमध्ये ४७ शतके झळकावली आहेत. ९८ वे शतक नुकतेच बंगळूर येथे विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध खेळताना पूर्ण केले आहे. सर ब्रॅडमन यांच्याशी तुलना केली जाणारा सचिन...एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या सचिन तेंडुलकरला शाळेपासूनच क्रिकेटची खूप आवड होती. आपल्या 'शारदा विद्यामंदिर' शाळेत क्रिकेटचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याकडून त्याने क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. शाळेत असतानाच जीवलग मित्र विनोद कांबळीबरोबर त्याने ६६४ धावांची भागीदारी रचली होती. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी त्याने मुंबई संघातून गुजरात संघाविरुद्ध खेळून नावलौकिक प्राप्त केला. सचिन तेंडुलकर याच्या कुटुंबियांचे, सचिन देव बर्मन म्हणजेच एस. डी. बर्मन हे आवडते संगीत दिग्दर्शक होते, यांच्या नावावरूनच त्याचे नाव "सचिन" ठेवले गेल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात.
सचिनने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १९८९ साली पाकिस्तानविरुद्ध कराची येथे खेळला. त्या सामन्यात त्याने वासिम अक्रम, इम्रान खान, अब्दुल कादिर आणि वकार युनूससारख्या दिग्गज गोलंदाजांचा सामना केला. सचिनची आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सुरुवात निराशाजनक झाली. वकार युनूसचा सुद्धा हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता, त्याने सचिनला १५ धावांवर त्रिफळाचीत केले. याचे उट्टे सचिनने फैसलाबाद येथील कसोटी सामन्यात आपले पहिले अर्धशतक झळकावून काढले. सचिनची आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमधील सुरुवातही खराब झाली. १८ डिसेंबरला झालेल्या आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात खाते उघडण्यापूर्वीच पुन्हा वकार युनूसने त्याला बाद केले. या मालिकेनंतर न्यूझीलंडच्या दौर्यात त्याचे पहिले कसोटी शतक १२ धावांनी हुकले. त्या सामन्यात नंतर भारताच्या प्रशिक्षकपदी आलेल्या जॉन राईटने सचिनचा झेल पकडला परिणामी सचिन जगातला सर्वात तरूण शतकी खेळी करणारा खेळाडू बनण्यापासून वंचित राहिला. अखेर १९९० सालच्या इंग्लंडच्या दौर्यात सचिनने आपले पहिले कसोटी शतक झळकावले. परंतु या काळात तो फारसे चांगले खेळू शकला नाही. तेंडुलकरला खरा सूर त्याच्या १९९१-९२ सालच्या ऑस्ट्रेलियन दौर्यात गवसला, यावेळी त्याने पर्थमधील वेगवान आणि उसळत्या खेळपट्टीवर सुंदर शतकी खेळी केली. सचिनला आत्तापर्यंत कसोटी सामन्यांमध्ये ११ वेळा सामनावीराचा बहुमान मिळाला आहे व २ वेळा तो बॉर्डर-गावसकर चषकामध्ये ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकावीर ठरला होता. यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचताना सचिनला अनेकदा अपमान देखील सहन करावे लागले, हे वेगळे लिहिण्याची गरज नाही.
सचिनने एकदिवसीय सामन्यात १७,०००पेक्षा अधिक धावा काढल्या आहेत. विश्वचषक स्पर्धेत सचिन आणखी कोणकोणते विक्रम नोंदवतो, याकडे संपूर्ण जगातील त्याच्या चाहत्यांचे लक्ष आहे.
सचिनची ९८ शतके याप्रमाणे:
धावसंख्या देश
119 इंग्लंड
148 ऑस्ट्रेलिया
114 ऑस्ट्रेलिया
111 दक्षिण आफ्रिका
165 इंग्लंड
104 श्रीलंका
142 श्रीलंका
179 वेस्ट इंडिज
122 इंग्लंड
177 इंग्लंड
169 दक्षिण आफ्रिका
143 श्रीलंका
139 श्रीलंका
148 श्रीलंका
155 ऑस्ट्रेलिया
177 ऑस्ट्रेलिया
113 न्यूझिलंड
136 पाकिस्तान
124 श्रीलंका
126 न्यूझिलंड
217 न्यूझिलंड
116 ऑस्ट्रेलिया
122 झिम्बाब्वे
201 झिम्बाब्वे
126 ऑस्ट्रेलिया
155 दक्षिण आफ्रिका
103 इंग्लंड
176 झिम्बाब्वे
117 वेस्ट इंडिज
193 इंग्लंड
176 वेस्ट इंडिज
241 ऑस्ट्रेलिया
194 पाकिस्तान
248 बांग्लादेश
109 श्रीलंका
101 बांग्लादेश
122 बांग्लादेश
154 ऑस्ट्रेलिया
153 ऑस्ट्रेलिया
109 ऑस्ट्रेलिया
103 इंग्लंड
160 न्यूझिलंड
100 श्रीलंका
105 बांग्लादेश
143 बांग्लादेश
100 दक्षिण आफ्रिका
106 दक्षिण आफ्रिका
203 श्रीलंका
214 ऑस्ट्रेलिया
111 दक्षिण आफ्रिका
146 दक्षिण आफ्रिका
110 ऑस्ट्रेलिया
115 न्यूझिलंड
105 वेस्ट इंडिज
112 श्रीलंका
127 केनिया
137 श्रीलंका
100 पाकिस्तान
118 पाकिस्तान
110 श्रीलंका
114 दक्षिण आफ्रिका
104 झिम्बाब्वे
117 न्यूझिलंड
100 ऑस्ट्रेलिया
143 ऑस्ट्रेलिया
134 ऑस्ट्रेलिया
100 केनिया
128 श्रीलंका
127 झिम्बाब्वे
141 ऑस्ट्रेलिया
118 झिम्बाब्वे
124 झिम्बाब्वे
140 केनिया
120 श्रीलंका
186 न्यूझिलंड
122 दक्षिण आफ्रिका
101 श्रीलंका
146 झिम्बाब्वे
139 ऑस्ट्रेलिया
122 वेस्ट इंडिज
101 दक्षिण आफ्रिका
146 केनिया
105 इंग्लंड
113 श्रीलंका
152 नामिबिया
100 ऑस्ट्रेलिया
102 न्यूझिलंड
141 पाकिस्तान
123 पाकिस्तान
100 पाकिस्तान
141 वेस्ट इंडिज
100 वेस्ट इंडिज
117 ऑस्ट्रेलिया
163 न्यूझिलंड
138 श्रीलंका
175 ऑस्ट्रेलिया
200 दक्षिण आफ्रिका
120 इंग्लंड