
राज्याच्या सांस्कृतिक वैभवात भर पडण्याच्या दृष्टीने पर्यटनास प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने असे आयोजन निश्चितच महत्त्वपूर्ण ठरते, यात खंड पडू न देण्याची दक्षता घेतली पाहिजे असे मत यावेळी श्री. भुजबळ यांनी व्यक्त केले. रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या महोत्सवात डॉ. राजा आणि राधा रेड्डी यांच्या कुचीपुडी नृत्याने वातावरणात गहिरे रंग भरले तर पंडित शिवकुमार शर्मा यांच्या संतूरवादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. महोत्सवाच्या दुसर्या (शेवटच्या) दिवशी गीता चंद्रन यांचे भरतनाट्यम् आणि देवकी पंडित यांच्या गायनाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, महोत्सवासाठी गेट वे ऑफ इंडिया तसेच घारापुरी येथून विशेष लाँचची व्यवस्था करण्यात आली होती.