मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकर आता आपल्या जागतिक विश्वविक्रमापासून अवघे एक पाऊल दूर आहे. शंभर धावांची अर्थात शतकांच्या शतकांसाठी शतकी शतक पूर्ण करण्यासाठी सचिनला आता अगदी थोडीच प्रतीक्षा करावी लागणार आहे. स्वभावाने अत्यंत शांत, संयमी, धीरोदत्त असणाऱ्या सचिनने 99 वे शतक झळकविण्यापूर्वी सुद्धा शांतपणे स्थिर बुद्धीने प्रत्येक चेंडूवर खेळी खेळून योग्य वेळी 4, 6 धावा काढून आणि अक्षरशः काही धावा पळून काढल्या. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतच सचिन आपले हे 100 वे शतक करणार हे मात्र नक्की...
मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.