मुंबई, ता. ७ - प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात काल (ता. ६) लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटरची प्रस्तुती असलेला 'मी मराठी' या सांगितिक कार्यक्रमाचा चौथा वर्धापनदिन तसेच ४०० वा प्रयोग सादर करण्यात आला. राज्याचे पर्यावरणमंत्री छगन भुजबळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी श्री. भुजबळ म्हणाले, की लोकशाहीर विठ्ठल उमप यांचा लोककलेच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा वारसा त्यांचे सुपुत्र नंदेश आणि संदेश यांनी अत्यंत समर्थपणे पुढे सुरू ठेवला आहे. विठ्ठल उमप यांची लोककलेवरील निष्ठा, संचार, प्रभुत्व इ. कौशल्याची प्रचिती 'मी मराठी' या कार्यक्रमातून येते. विठ्ठल उमप यांना जनतेने जे प्रेम दिले तसेच प्रेम उमप बंधूंना देखील लाभेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी ढोलकीसम्राट राजाराम जामसंडेकर, पंडित बी. ए. तुपे गुरुजी, पत्रकार युवराज मोहिते यांच्यासह श्रीमती वत्सला विठ्ठल उमप उपस्थित होत्या.