मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

article लेबलसह पोस्ट दाखवत आहे

“शतकी लग्नगाठ” बांधायला लावणारी...अर्धशतकी लग्नगाठ!

श्री. किशोर कुळकर्णी आणि माझा परिचय तसा ‘दैनिक तरूण भारत ’ पासूनचा..। पण त्यांच्या प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचे परिक्षण करण्याइतका काही मी पात्र नाही. जेव्हा विद्यार्थ्याचा शिक्षक होतो, तेव्हा परीक्षक होऊन परीक्षा घेतली जाते, परिक्षण केले जाते, मी मात्र अद्याप विद्यार्थीच आहे. दुसरं म्हणजे माझ्या लग्नगाठीला अद्याप एक तप सुद्धा पूर्ण झालेलं नाही, आणि विविध दिग्गजांनी त्यांची मतं इथे प्रस्तुत केली आहेत परिणामी, मी या पुस्तकाविषयी काय लिहिणार? पण दिलेली जबाबदारी पूर्ण करावीच लागेल, म्हणून या क्षणी पुस्तकाचे परिक्षण करण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न...! तसं पाहिलं तर ‘किशोर’ नावाच्या व्यक्तींचा स्वभाव जरी भिडस्त वाटत असला तरीही त्यांना लोकांच्या गरजा, आवडी-निवडी यांची जाणीव असते. आपल्या कार्यानेच ते लोकप्रिय होऊन सर्वश्रृत होऊन यशस्वी होतात, त्यांच्या कार्याचा सुगंध त्रिभुवनी पसरतो. स्व. गायक किशोर कुमार यांच्या उदाहरणाने आपला या गोष्टीवर विश्वास नक्की बसावा. सुरवातीला किशोर कुळकर्णी यांचे लेख ‘दैनिक सकाळ’ मध्ये टप्प्याटप्प्याने मालिकेच्या माध्यमातून अनेक भागात प्रसिद्ध करण्यात आले. सोला