पुणे, ता. 25 - आज सकाळी राज्य परिवहन मंडळाची बसचा ताबा घेऊन सुमारे 40 गाड्या चिरडून तर 9 लोकांना ठार मारून 25 जणांना जखमी करणाऱ्या बसचालकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. संबंधित बसचा चालक बसच्या सीटवर नाही हे पाहून दुसरा बसचालक संतोष माने याने बस सुरू केली. त्याने नंतर चुकीच्या दिशेने (राँग साइड) सुमारे अर्धा तास 16 किलोमीटरपर्यंत बस चालवून अनेक वाहनांचे नुकसान केले तसेच काही विक्रेते, पादचाऱ्यांना जखमी केले. शेवटी निलायम थिएटरजवळ माने याने बस थांबविली. सूत्रांनुसार, माने हा मनोरुग्ण असून त्याला उपचारार्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातात जखमी झालेल्यांना देखील शहरातील तीन विविध हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.