मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मुंबई सायक्लोथॉन लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अमेरिकेचा रॉबी हंटर 'मुंबई सायक्लोथॉन' चा विजेता

  मुंबई, ता. १३ - अत्यंत उत्साहात पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय मुंबई सायक्लोथॉन 'टूर द मुंबई-२०११' मध्ये आज अमेरिकेच्या रेडिओशेक टीमच्या रॉबी हंटर याने राजीव गांधी सागरी सेतूच्या साक्षीने १०४ किमी. चे अंतर पार करून विजेतेपद पटकाविले. इटलिच्या लिक्विगॅस टीमचा इलिया व्हिव्हियानी आणि यूके मोटरपॉईंट टीमच्या जॉनी एकव्हॉय यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. यांना अनुक्रमे १५ हजार, सहा हजार आणि तीन हजार युरोचे बक्षीस मिळाले. भुजबळ फाऊंडेशन, आयडी स्पोर्ट्स, युनियन सायक्लिक इंटरनॅशनल आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या सायक्लोथॉनमध्ये १२ देशांचे विविध संघ तसेच तीन देशांच्या राष्ट्रीय संघांच्या सुमारे १०८ स्पर्धकांनी भाग घेतला. यासह २८ किलोमीटरची ऍमॅच्युअर राईड, प्रत्येकी १५ किलोमीटरच्या कॉर्पोरेट व ग्रीन राईड्स, ३ किलोमीटरची किड्स राईड अशा अन्य विभागांमध्ये एकूण ९५०० पेक्षा अधिक सायकलस्वारांनी सहभागी होऊन "पर्यावरण रक्षणासाठी सायकल चालवा" हा संदेश दिला. १२ आंतरराष्ट्रीय संघांव्यतिरिक्त भारताच्या स्पर्धकांनीही या स्प...