येथील लोकमान्य नगरमध्ये रविवारी (ता. २४) आयोजित गीत रामायण कार्यक्रमात श्रीधर फडके यांच्या गीतांनी इंदूरच्या रसिक-श्रोत्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. स्व. सुधीर फडके उर्फ बाबूजी यांचे स्मरण यावेळी प्रत्येकाला झाले. श्री. श्रीधर फडके यांच्या प्रत्येक पदाला आणि गीताला रसिकांनी भरभरुन दाद दिली, विवेक घळसासी यांच्या निवेदनाने श्रोत्यांना खुर्च्यांना खिळवून ठेवले. गेले तीन दिवस घळसासी यांच्या सुरू असलेल्या रामकथेच्या प्रवचनाचा समारोप काल करण्यात आला. श्रीधर फडके यांनी सादर केलेल्या गीत रामायणाच्या सुरेल स्वरांचे श्रेय बाबूजी आणि ग.दि. माडगूळकर यांना असल्याचे सांगून आपण फक्त त्यांचे महान कार्य सुरू ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. गाताना शब्दांमागील भावनांसह स्पष्ट शब्दोच्चार करणे आणि भावगीत संगीतबध्द करताना शब्दांच्या वजनासकट त्यातला भाव, कवीची भूमिका रसिकांपर्यंत पोहोचवणे, तसेच या दोन्हींसह गाणे ‘जिवंत करणे’ या गोष्टींना आपल्या कारकीर्दीत त्यांनी सर्वाधिक महत्त्व दिले. संगीतातली नवी वळणे आत्मसात करताना त्यांचा एक धागा परंपरेशी घट्ट जोडलेला होता, त्यामुळेच बाबुजी सुरांच्या गाभ्या...