मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

IT लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नवी मुंबईने पाडला स्वेच्छा सीसीटीव्ही कॅमेरा देखरेखीचा नवा पायंडा

नवी मुंबई, (प्रतिनिधी) - सीसीटीव्ही देखरेखीसाठी स्वेच्छेने आचारसंहिता राबविणारे नवी मुंबई हे देशातील पहिलेच शहर ठरले आहे. शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता संभाव्य गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी वर्दळीच्या ठिकाणी छुप्या कॅमेऱ्यांद्वारे देखरेख ठेवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे सिडकोने स्वेच्छा सीसीटीव्ही कॅमेरा देखरेखीची आचारसंहिता तयार केली. सिडको अधिकारकक्षेतील खाजगी तसेच सरकारी आस्थापनांनी या आचारसंहितेला मान्यता दिली आहे. सीसीटीव्ही प्रकल्पासाठी सिडकोने सुकाणू समिती स्थापन केली होती. राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव श्री. राजेश अग्रवाल हे या समितीचे अध्यक्ष आहेत. प्राइसवॉटरहाऊसकूपर्स हे सिडकोचे या प्रकल्पासाठी सल्लागार आहेत. समितीने नवी मुंबईतील सर्व खाजगी आणि सरकारी संघटना, संस्था आणि कंपन्यांच्या वरिष्ठांशी या संहितेबाबत चर्चा करून ती निश्चित केली. या संहितेनुसार रेल्वे स्थानके, दुकाने, मॉल्स, चित्रपटगृह, हॉटेल्स, धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्यालये, गृहनिर्माण प्रकल्प, कारखाने, गोदामे अशा विविध सार्वजनिक स्थळी छुपे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. ही...

इंटरनेट गावोगावी पोहोचणार, पण..

अजूनही घराघरात कॉम्प्यूटर नाही.... अजूनही अनेकांकडे कॉम्प्यूटर विकत घेण्याइतका पैसा नाही.... अजूनही वीज भारनियमनाचे प्रमाण फार आहे.... अजूनही अनेकजण संगणक साक्षर नाहीत.... अजूनही अनेकांना इंटरनेट म्हणजे बाऊ वाटतो.... अजूनही अनेक शासकीय अधिकारी इंटरनेटचा वापर जेमतेम करतात.... अजूनही शासनाने ग्रामीण भागात इंटरनेटसाठी सखोल प्रयत्न केले नाहीत.... अजूनही अनेकांना कॉम्प्यूटर व्यवस्थित ऑपरेट करता येत नाही.... अजूनही............वेळ........गेलेली..............नाही...........!

कॉम्प्यूटर होतोय हुश्शार...

कॉम्प्यूटर, संगणक म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रॉनिक स्वरुपात माहिती विश्लेषित करणारे, माहिती देणारे, सांख्यिकी आकडेमोड करणारे उपकरण असे आपण म्हणू शकतो. स्मृती म्हणजेच स्मरणशक्ती, तसेच तर्क म्हणजे कल्पनाशक्ती...या दोन शक्ती ज्या व्यक्तीच्या अंगी अचाट असतील अशी व्यक्ती अत्यंत चुणुकदार, हुशार मानली जाते. हत्ती या प्राण्याची स्मरणशक्ती देखील अचाट असते असे म्हणतात. बहुदा मानव आणि हत्ती यांच्या कल्पना आणि स्मृती या दोन गोष्टी ध्यानात घेऊनच संगणकाचा शोध लागला असावा, असे वाटणे स्वाभाविक आहे. कॉम्प्यूटरमुळे मानव जरी जगाच्या पलिकडे आणि अलिकडे पोहोचला असला तरीही अद्याप कॉम्प्यूटर हुशार होतोय. मानवाला एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आणि माहितीचे अदान-प्रदान करण्यासाठी विशिष्ट माध्यमाची आवश्यकता असते, त्यासाठी भाषा हे उत्कृष्ट साधन असते. परिणामी आज जगात अनेक भाषा असून कॉम्प्यूटरचे सुद्धा हेच आहे, कॉम्प्यूटरच्या सुद्धा सी, जावा यासारख्या अनेक भाषा आहेत. कॉम्प्यूटर बनवणाराही माणूसच आहे नां, यामुळे माणसाने जी भाषा, ज्या भाषा त्याच्या निर्मितीच्या वेळी फीड केल्या असतील (कॉम्प्यूटरच्या डोक्यात भरवल्या असतील) त्य...