मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

New world लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कॉम्प्यूटर होतोय हुश्शार...

कॉम्प्यूटर, संगणक म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रॉनिक स्वरुपात माहिती विश्लेषित करणारे, माहिती देणारे, सांख्यिकी आकडेमोड करणारे उपकरण असे आपण म्हणू शकतो. स्मृती म्हणजेच स्मरणशक्ती, तसेच तर्क म्हणजे कल्पनाशक्ती...या दोन शक्ती ज्या व्यक्तीच्या अंगी अचाट असतील अशी व्यक्ती अत्यंत चुणुकदार, हुशार मानली जाते. हत्ती या प्राण्याची स्मरणशक्ती देखील अचाट असते असे म्हणतात. बहुदा मानव आणि हत्ती यांच्या कल्पना आणि स्मृती या दोन गोष्टी ध्यानात घेऊनच संगणकाचा शोध लागला असावा, असे वाटणे स्वाभाविक आहे. कॉम्प्यूटरमुळे मानव जरी जगाच्या पलिकडे आणि अलिकडे पोहोचला असला तरीही अद्याप कॉम्प्यूटर हुशार होतोय. मानवाला एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आणि माहितीचे अदान-प्रदान करण्यासाठी विशिष्ट माध्यमाची आवश्यकता असते, त्यासाठी भाषा हे उत्कृष्ट साधन असते. परिणामी आज जगात अनेक भाषा असून कॉम्प्यूटरचे सुद्धा हेच आहे, कॉम्प्यूटरच्या सुद्धा सी, जावा यासारख्या अनेक भाषा आहेत. कॉम्प्यूटर बनवणाराही माणूसच आहे नां, यामुळे माणसाने जी भाषा, ज्या भाषा त्याच्या निर्मितीच्या वेळी फीड केल्या असतील (कॉम्प्यूटरच्या डोक्यात भरवल्या असतील) त्य