मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डॉक्टरांची माफिया गँग लेबलसह पोस्ट दाखवत आहे

"डॉक्टरांची माफिया गँग" पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई, ता. १८ (वार्ताहर)- राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत उर्फ काकासाहेब पुरंदरे यांच्या "डॉक्टरांची माफिया गँग" या पुस्तकाचे काल (ता. १७) प्रकाशन करण्यात आले. मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या या कार्यक्रमात शिवनेर चे संपादक नरेंद्र वाबळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद मोकाशी, माउंट अबू येथील डॉ. सचिन परब, योगतज्ज्ञ दादा वैशंपायन, श्रीकृष्ण चैतन्यप्रभू, डॉ. वाघमारे आदी उपस्थित होते. यावेळी भुजबळ म्हणाले, की पुरंदरे यांचे अनुभव तसेच सामान्य माणसाला माहित नसलेल्या अनेक गोष्टी या पुस्तकात वाचायला मिळतात. हे पुस्तक वास्तवावर आधारित आहे. व्याधी दूर व्हाव्यात म्हणून योगोपचार उत्तम औषध असल्याचं भुजबळ म्हणाले. तीस वर्षांपूर्वी अमेरिकेतल्या लोकांना सुद्धा योगोपचाराचं महत्व पटलेलं आपण पाहिलं आहे. काका पुरंदरे म्हणजे समाजाचं स्वास्थ्य टिकवण्यासाठी परखड शब्दात डोळ्यात अंजन घालणारा ज्येष्ठ पत्रकार आहे. वैद्यकीय क्षेत्रात काही अपप्रवृत्ती असल्या तरी नि:स्वार्थीपणे व पैशाची अपेक्षा न ठेवता कार्य करणारे डॉक्टर्ससुद्धा असंख्य आ