मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

पनवेल-इंदापूर चौपदरीकरण लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पनवेल-इंदापूर टप्प्याच्या चौपदरीकरणाचे काम तत्काळ सुरू करणार

मुंबई, ता. १२- मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापूर या टप्प्यातील चौपदरीकरणाच्या कामास केंद्र सरकारची मंजुरी मिळाली असून सुमारे ५५३ कोटी रुपये खर्चाचे काम तत्काळ सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. मुंबई-गोवा राज्यमार्ग क्र. १७ वरील इंदापूर ते झाराप या चार टप्प्यातील रस्त्याच्या चौपदरीकरणाचा सुसाध्यता अहवाल तपासण्याचे काम सुरू असून ते येत्या मार्च २०११ पर्यंत पूर्ण होईल. यानंतर या कामाचा अहवाल केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येऊन मंजुरीनंतर चौपदरीकरणाचे हे काम त्वरीत सुरू करण्याच्या दृष्टीने आपण स्वतः प्रयत्नशील आहोत. हे काम इंदापूर ते कशेळी घाट (लांबी ७७ किमी), कशेळी घाट ते संगमेश्वर (लांबी ९९ किमी), संगमेश्वर ते टाकेवाडी (लांबी १०७ किमी), टाकेवाडी ते झाराप (लांबी ८३ किमी) याप्रमाणे चार टप्प्यात आहे. झाराप ते पत्रादेवी हे सुमारे २१ किमी रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर असून येत्या डिसेंबर २०११ पर्यंत हे पूर्ण होईल.