मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

कोकणचा समुद्रकिनारा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कोकणच्या समुद्रकिनार्‍यांची भुजबळांनी केली हवाई पाहणी

मुंबई, ता. १३ - राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी आज राज्याच्या निसर्गसंपन्न कोकण किनारपट्टीची हवाई पाहणी केली. महाराष्ट्राला ७२० किलोमीटर लांबीचा वैभवशाली समुद्रकिनारा लाभला आहे. ही किनारपट्टी म्हणजे कोकणच्या सर्वांगीण पर्यटन विकासाची गुरूकिल्ली आहे. हीच बाब हेरून श्री. भुजबळ यांनी कोकणच्या विकासाला चालना देण्याचे धोरण स्वीकारले आहे. यावेळी त्यांचे समवेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी होते. श्री. भुजबळ यांनी मांडवा, किहीम, रेवस, जयगड किल्ला जयगड जेटी, कुणकेश्वर येथील केशवसुत स्मारकाची पाहणी केली. याचबरोबर गणपतीपुळे येथील मंदीर व परिसर तसेच तेथील एमटीडीसीच्या रिसॉर्टमधील व्यवस्थेचीही पाहणी केली.