मुंबई, ता. १६ - सुमारे ३८ हजारांहून अधिक देशी-विदेशी नागरिकांचा सहभाग लाभलेल्या स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉन-२०११ मधील विजेत्यांना राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. मुंबई मॅरेथॉनमधील ४२ किलोमीटर लाँग-रन मध्ये आज इथिओपियाच्या गिरीमा असेफा याने विजेतेपद मिळविले. इथिओपियाच्याच बोटो सिगाए वोल्ड याने द्वितीय तर केनियाच्या पॅट्रिक मुरिकी याने तृतीय क्रमांक पटकाविला. महिलांच्या गटात देखील इथिओपियाचेच वर्चस्व कायम राहिले. भारतीय धावपटूंच्या गटात पुण्याच्या आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटचे राहिले. प्रारंभी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून के. शंकरनारायणन् यांच्या हस्ते मॅरेथॉनचे उद्घाटन करण्यात आले. मॅरेथॉनमध्ये अभिनेता विवेक ओबेरॉय, जॉन अब्राहम, मंत्री जयदत्त क्षीरसागर, अभिनेत्री दीपिका पदुकोण, गोरी खान, परमेश्वर गोदरेज आदींनी सहभाग घेतला होता.