शिवराजसिंग चव्हाण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
शिवराजसिंग चव्हाण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
रविवार, ८ डिसेंबर, २०१३
प्रदेशाच्या विकासात काँग्रेसने सहकार्य करावे- शिवराज
इंदूर- ता. ८ डिसेंबर- मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत अपेक्षानुरुप विजयाचा आनंद ओसंडून वाहणार्या मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांनी प्रदेशाच्या विकासात काँग्रेसने सहकार्य करण्याचे आवाहन आज आपल्या आभारप्रदर्शनात केले. श्री. चव्हाण यांनी देखील गुजराथचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच हॅटट्रिक केली आहे. मध्यप्रदेशात तिसर्यांदा कमळ फुलल्याचा आनंद श्री. चव्हाण यांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होता.
आज संध्याकाळी श्री. शिवराज चव्हाण यांनी विधानसभा निवडणूक २०१३ मध्ये प्रदेशातील मतदारांनी भाजपास बहुमताने विजय मिळवून दिल्याबद्दल मतदारांचे, पक्षकार्यकर्ते, पदाधिकारी, पक्षाचे केंद्रीय नेतृत्व, ज्येष्ठ-श्रेष्ठांचे आभार मानले. निवडणुकीत आरोप-दोषारोप होतच असतात, माझा कोणावरही राग नाही. निवडणुका पार पडल्या. व्हायचे तेवढे राजकारण झाले. आता काँग्रेसने देखील प्रदेशाच्या विकासासाठी आपल्याला सहकार्य करण्याचे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले.
यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की, जनता जनार्दनाच्या स्नेह आणि प्रेमामुळेच पक्षास बहुमत प्राप्त झाले आहे. पक्ष कार्यकर्त्यांनी विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याचा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला. आपण अद्याप सामान्य कार्यकर्ता आणि जनतेचे सेवक आहोत. पक्षाने आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी दिली याबद्दल त्यांनी पक्षाचे आभार मानले. मध्यप्रदेश हे आपल्यासाठी मंदीर असून प्रदेशातील सर्व नागरीक आपले देव असल्याचे त्यांनी सांगितले. विजयासोबत विनम्रतेस कधीही विसरू नये, घमेंड करू नये असा मोलाचा सल्ला देखील श्री. चव्हाण द्यावयास विसरले नाहीत.
क्षणचित्रे-
* शिवराज चव्हाण यांना पेढा भरविण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी.
* आपल्या सर्व भाच्यांचे आभार..असा उल्लेख श्री. चव्हाण यांनी केल्यानंतर...शिवराज मामा की जय...घोषणांनी परीसर दुमदुमला.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
सिडकोच्या गृहनिर्माण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; अंतिम यादी १० सप्टेंबरला
सिडकोच्या ऑगस्ट २०२६ गृहनिर्माण योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, योजनेअंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ४,७...
-
पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्...
-
मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भवि...
-
नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी ...
