मुख्य सामग्रीवर वगळा

प्रदेशाच्या विकासात काँग्रेसने सहकार्य करावे- शिवराज

इंदूर- ता. ८ डिसेंबर- मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत अपेक्षानुरुप विजयाचा आनंद ओसंडून वाहणार्‍या मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांनी प्रदेशाच्या विकासात काँग्रेसने सहकार्य करण्याचे आवाहन आज आपल्या आभारप्रदर्शनात केले. श्री. चव्हाण यांनी देखील गुजराथचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच हॅटट्रिक केली आहे. मध्यप्रदेशात तिसर्‍यांदा कमळ फुलल्याचा आनंद श्री. चव्हाण यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होता. आज संध्याकाळी श्री. शिवराज चव्हाण यांनी विधानसभा निवडणूक २०१३ मध्ये प्रदेशातील मतदारांनी भाजपास बहुमताने विजय मिळवून दिल्याबद्दल मतदारांचे, पक्षकार्यकर्ते, पदाधिकारी, पक्षाचे केंद्रीय नेतृत्व, ज्येष्ठ-श्रेष्ठांचे आभार मानले. निवडणुकीत आरोप-दोषारोप होतच असतात, माझा कोणावरही राग नाही. निवडणुका पार पडल्या. व्हायचे तेवढे राजकारण झाले. आता काँग्रेसने देखील प्रदेशाच्या विकासासाठी आपल्याला सहकार्य करण्याचे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले. यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की, जनता जनार्दनाच्या स्नेह आणि प्रेमामुळेच पक्षास बहुमत प्राप्त झाले आहे. पक्ष कार्यकर्त्यांनी विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याचा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला. आपण अद्याप सामान्य कार्यकर्ता आणि जनतेचे सेवक आहोत. पक्षाने आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी दिली याबद्दल त्यांनी पक्षाचे आभार मानले. मध्यप्रदेश हे आपल्यासाठी मंदीर असून प्रदेशातील सर्व नागरीक आपले देव असल्याचे त्यांनी सांगितले. विजयासोबत विनम्रतेस कधीही विसरू नये, घमेंड करू नये असा मोलाचा सल्ला देखील श्री. चव्हाण द्यावयास विसरले नाहीत. क्षणचित्रे- * शिवराज चव्हाण यांना पेढा भरविण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी. * आपल्या सर्व भाच्यांचे आभार..असा उल्लेख श्री. चव्हाण यांनी केल्यानंतर...शिवराज मामा की जय...घोषणांनी परीसर दुमदुमला.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012