शीण सुस्ती महानिद्रा, क्षणात पळवी चहा
प्रभाते तोंड धुवोनी, घेता वाटे प्रसन्नता...
अर्धांगिनी हस्ते घेता, निद्रा तात्काळ विरघळे
पुन्हा स्नानांतरे घेता, अंगी चैतन्य सळसळे...
लिंबुयुक्त विना दुग्ध, अरुची पित्त घालवी
शर्करेविना घेता, मधुमेह न गांजवी...
शितज्वर शिरःशूळा, खोकला नाक फुरुफुरा
गवतीपत्र अद्रकयुक्त, प्राशित जाई सत्वरा...
भोजनपूर्व प्राशिता, मंदाग्नी, पित्तकारका
घोटता घोटता वाढे, टॅनिन जहरकारक...
चहाविना आप्त स्नेह्यांचे, स्वागतासी अपूर्णता
यास्तव भूतल जन म्हणती ह्याची अमृता...
इति सुहासविरतिम् चहास्तोत्रम्
चहाबाजप्रित्यर्थम् संपूर्णम्...।।।
(संग्रहित...)
मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.