मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

आरक्षण लेबलसह पोस्ट दाखवत आहे

गोव्यात इतर मागासवर्गीयांसाठी 27 टक्के आरक्षण लागू झालेच पाहिजे

  म्हापसा, गोवा, दि. 3 एप्रिल : गोवा पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त झाल्याच्या घटनेला यंदा 50 वर्षे पूर्ण होत आहेत. गोवा मुक्तीच्या या सुवर्णमहोत्सवी वर्षामध्ये गोव्यात इतर मागासवर्गीय समाजघटकांचे आरक्षण सध्याच्या 19 टक्क्यांवरुन वाढवून 27 टक्के करण्याची जोरदार मागणी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम तथा पर्यटन मंत्री आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांनी आज येथे केली. ही मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी लावून धरण्याचे आवाहनही त्यांनी केले. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा गोव्यातील पहिलाच मेळावा येथील बोडकेश्वर मंदिराच्या मैदानावर झाला. सुमारे पाच हजार समता सैनिकांची उपस्थिती लाभलेल्या या मेळाव्यास गोव्यातील विविध लहानमोठया सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. समता परिषद ही पूर्णत: पक्षविरहित काम करणारी संघटना असून तिच्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय या बहुजन मागासवर्गीय समाजघटकांच्या विकासासाठी लढले पाहिजे, एवढी एकच असल्याची बाब भाषणाच्या सुरवातीलाच श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केली. त्याचप...

मराठ्यांना आरक्षण देण्याच्या भूमिकेवर भुजबळ ठाम

मुंबई, ता. २ नोव्हेंबर- ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्यात यावे ही माझी भूमिका कायम आहे. मात्र, मराठा आरक्षणासाठी कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतल्यास पुढाकार घेईन, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी येवला येथे केले. भुजबळ यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्हा बँकेचे संचालक ऍड. माणिकराव शिंदे, नगरसेविका उषा शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षात नव्याने आलेल्या कोणत्याही कार्यकर्त्याला दुय्यम वागणूक दिली जाणार नाही असे सांगून भुजबळ यांनी प्रत्येक घरात पैशाची आवक होईल तेव्हाच खराखुरा विकास होईल असे प्रतिपादन केले.