मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

chatting लेबलसह पोस्ट दाखवत आहे

इंटरनेटमुळे बहिण-भाऊ झाले मित्र...

इंटरनेटच्या माध्यमातून दिवसेंदिवस जग जवळ येत आहे. अगदी दिल्लीपासून गल्ली देखील जवळ आली आहे. देशांतर्गत, परदेशात स्थायिक झालेली कुटुंब सुद्धा याला अपवाद नाहीत. दूर राहून एकमेकांची सुखदुःख विचारणारे बहिण-भाऊ आता एकमेकांचे मित्र बनले आहेत. एक काळ होता..महिलांनी घराबाहेर जास्त जाऊ नये, सुधारणावादी महिलांना यामुळे सासरी अथवा काही प्रमाणात माहेरी देखील त्रास सहन करावा लागत होता. शिक्षण देखील मुलांनाच जास्त दिले जात होते, अशा पूर्वीच्या काळातल्या विविध गोष्टींचा उल्लेख आता करायची गरज वाटत नाही, त्या जगजाहीर आहेतच. परंतु आता काळ बदललाय, जग खूपच जवळ आलं आहे. घरी बसून केवळ स्वयंपाक करणार्‍या महिलांचे हात आता विविध क्षेत्रात आपले करियर करताहेत. आज भारतासारख्या भावी महासत्ता म्हणून पाहिल्या जाणार्‍या देशाची धुरा देखील एक महिलाच सांभाळते आहे. शिक्षण-प्रशिक्षण आणि चालना यामुळे जवळपास सर्वच क्षेत्रांचा विकास झाला असून या यशामागे पुरुषांबरोबर महिलांचाही मोठा वाटा आहे. अनेक देश आता सैन्यातही महिलांच्या पथकांचा समावेश करण्यास धजावले आहेत. लोहमार्गावर रेल्वे चालकापासून वैमानिकाची जबाबदारी सक्षमपणे सांभा