ममता बॅनर्जी सादर करीत असलेले रेल्वे बजेट २०११ ऐकताना माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव. रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी सादर करीत असलेल्या ५७.६३० कोटिंच्या रेल्वे बजेट २०११ चे ठळक मुद्दे...:- * आम-आदमी अर्थात सामान्य माणसाला लक्षात घेऊन बजेट... * सिंगूर येथे मेट्रो कोच फॅक्टरी * रायबरेली कारखान्यातून पहिला कोच तीन महिन्यात * अनेक गाड्यांची कोच साठी मागणी, नवीन कोच फॅक्टरींचा प्रस्ताव * जम्मू काश्मिरमध्ये ब्रिज फॅक्टरी * रेल्वे नेटवर्कला इम्फाळ जोडणार * १८० किलोमीटरचा नवीन लोहमार्ग * ८५ नवीन सार्वजनिक-खाजगी प्रकल्प * नंदीग्राममध्ये इंडस्ट्रियल पार्क * रेल-रोको आंदोलने थांबविण्याचे प्रत्येकास आवाहन * रेल्वे मार्गाजवळ राहणार्या बेघरांसाठी १०,००० निवारे * रेल्वे अपघातांचे प्रमाण गेल्या वर्षीच्या २९ टक्क्यांवरून १७ टक्क्यांवर आले. * ऑनलाइन बुकिंग स्वस्त होणार * पायलट प्रोजेक्ट्समध्ये स्मार्ट कार्ड वापरले जाणार * रेल्वेचे कर्मचारी हीच रेल्वेची मोठी संपत्ती