मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

कोविड-१९ लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नवी मुंबई गृहनिर्माण संस्थांनी कोविड १९ साठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान द्यावे- सिडको

जगभर सर्वत्र थैमान घालणाऱ्या कोविड-१९ अर्थात कोरोना विषाणूचा सामना करायला महाराष्ट्र शासनास मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आपले योगदान देण्याचे आवाहन सहनिबंधक, सहकारी संस्था, सिडको यांच्यातर्फे त्यांच्या नवी मुंबईतील अधिकारक्षेत्रातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांना करण्यात आले आहे. कोविड-१९ विषाणूमुळे उद्भवलेल्या पॅनडेमिकचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे औषधे व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, रोजगार गमावलेल्या मजूर, कामगार आदी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना अन्न, निवारा व अन्य सुविधा पुरविणे इ. कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या कामांकरिता मोठ्या प्रमाणावर निधीची गरज आहे. याकरिता समाजातील व्यक्ती, संस्था, उद्योग समूह अशा विविध स्तरांतून येणारा आर्थिक मदतीचा ओघ हा मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड १९ मध्ये संकलित करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अशाप्रकारच्या नैसर्गिक आपत्तींच्या काळात मदतीसाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या गृहनिर्माण संस्थांनी आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाचा भाग म्हणून मुख्यमंत्री सहाय्यत निधीसही आपले आर्थिक योगदान देणे अपेक्षित आहे. तसेच महार...