मुंबई, दि. 13 एप्रिल : राज्याच्या रस्ते विकास योजना 1981-2001ची मुदत संपली असल्याने रस्ते विकासाचा पुढील 20 वर्षीय आराखडा तयार करण्यात आलेला असून त्यानुसार 3,36,994 किलोमीटर लांबीच्या रस्तेविकासाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत दिली. सार्वजनिक बांधकाम व पर्यटन विभागांच्या सन 2011-12च्या अर्थसंकल्पातील मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 7880.71 कोटी रुपयांच्या 11 मागण्या मंजुरीसाठी असून यापैकी 3812.68 कोटी रुपयांच्या मागण्या योजनांतर्गत तर 4068.03 कोटी रुपयांच्या मागण्या योजनेतर असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. श्री. भुजबळ म्हणाले, राज्याच्या सन 2001-21च्या नूतन रस्ते विकास आराखडयानुसार राज्यातील 100 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेली खेडी किमान एका बारमाही रस्त्याने जोडण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हा आराखडा पूर्ण होण्यासाठी साधारणपणे 1,09,000 कोटी रुपये एवढया निधीची आवश्यकता भासणार आहे. राज्याच्या वार्षिक योजनेतून उपलब्ध होणारा अल्प निधी विचारात घेता हे उद्दिष्...