माझंही एक स्वप्न होतं: मी मोठा होईन, लेखक होऊन एक छानसं पुस्तक लिहिन...वाचकांच्या खूप खूप प्रतिक्रिया मिळवेन...पण, पण, पण काय? शेवटी उलटंच झालं. या पुस्तकामुळे बरंच काही आणि सर्व काही होत असतं. खूप खूप पुस्तकं वाचली असती, तर ते सहज शक्य झालं असतं, पण तेव्हा आजच्या इतकी अक्कल नव्हती नां, पुस्तकं फाडणं जास्त माहित होतं. इतकं तरी ठीक आहे, की 'थोडी फार' नाही तरीही 'फार थोडी', पुस्तकं वाचल्यामुळे आज इतकं तरी करू शकतोय. पण बरोबरीचे मित्र कुठल्याकुठे निघून गेले याचं "शल्य" बोचतयं मनातल्या मनात, पण सांगू कोणाला? "कर्म" माझं, काही इलाज नाही. आज 'पुस्तक दिवस' या मथळ्यामुळे काहीतरी उगाच लिहावसं वाटलं, म्हणून ही गिचमिड... आज (२३ एप्रिल) सर्वत्र पुस्तक दिवस साजरा केला जातोय. खरंय। पुस्तकच आपल्याला सर्व काही देते. पुस्तकामुळे अनेक गोष्टी शक्य होतात. आजच्या या 'पेपरलेस्' होऊ पाहणार्या युगात अजूनही पुस्तकाशिवाय पानही हलत नाही. मानवाने कितीही प्रगती केली, तरीही पुस्तकाचे महत्व कमी होणार नाहीच. प्रगती केली तरीही पुस्तक...अधोगती केली/झाली तरीही पुस्तक.