मुख्य सामग्रीवर वगळा

"पुस्तक दिवस" निमित्त...

माझंही एक स्वप्न होतं: मी मोठा होईन, लेखक होऊन एक छानसं पुस्तक लिहिन...वाचकांच्या खूप खूप प्रतिक्रिया मिळवेन...पण, पण, पण काय? शेवटी उलटंच झालं. या पुस्तकामुळे बरंच काही आणि सर्व काही होत असतं. खूप खूप पुस्तकं वाचली असती, तर ते सहज शक्य झालं असतं, पण तेव्हा आजच्या इतकी अक्कल नव्हती नां, पुस्तकं फाडणं जास्त माहित होतं. इतकं तरी ठीक आहे, की 'थोडी फार' नाही तरीही 'फार थोडी', पुस्तकं वाचल्यामुळे आज इतकं तरी करू शकतोय. पण बरोबरीचे मित्र कुठल्याकुठे निघून गेले याचं "शल्य" बोचतयं मनातल्या मनात, पण सांगू कोणाला? "कर्म" माझं, काही इलाज नाही. आज 'पुस्तक दिवस' या मथळ्यामुळे काहीतरी उगाच लिहावसं वाटलं, म्हणून ही गिचमिड...
आज (२३ एप्रिल) सर्वत्र पुस्तक दिवस साजरा केला जातोय. खरंय। पुस्तकच आपल्याला सर्व काही देते. पुस्तकामुळे अनेक गोष्टी शक्य होतात. आजच्या या 'पेपरलेस्' होऊ पाहणार्‍या युगात अजूनही पुस्तकाशिवाय पानही हलत नाही. मानवाने कितीही प्रगती केली, तरीही पुस्तकाचे महत्व कमी होणार नाहीच. प्रगती केली तरीही पुस्तक...अधोगती केली/झाली तरीही पुस्तक...। किंबहुना पेपर म्हणजेच कागदाचे महत्वच दिवसेंदिवस वाढत आहे.
कॉम्प्यूटरमध्ये रेकॉर्ड जरी फीड केले जात असले, तरीही त्याची दखल, नोंद घेणे आवश्यक असतेच. विविध प्रकरणांमध्ये, घटनांमध्ये पुरावा म्हणून प्रत्यक्ष कागद, पुस्तकच वापरले, सादर केले जाते. लहानपणी शाळेत विद्यार्थ्यांना, पुस्तकी कीडा व्हा...असा उपदेश केला जातो. कित्ता गिरवण्याचे बाळकडू पाजले जाते. प्राचीन काळापासूनच पुस्तकाचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे सांगता येईल, अगदी जुने ग्रंथ पाहा, ते देखील कागदावरच रचून त्याचा ग्रंथ तयार करण्यात आल्याचे दिसून येते. पुस्तक वाचण्यासाठी काही तास लागत असले, किंवा छोटेसे वाटत असले, तरी त्याची निर्मिती वाटते तितकी सोपी नाही. जसं आपण जेवण अवघ्या काही मिनिटात करतो, परंतु त्यासाठी स्वयंपाक करणार्‍या व्यक्तीला किती मेहनत घ्यावी लागते? अगदी हे असेच आहे. पे आणि पै म्हणजेच पेपर अर्थात कागद आणि पैसा हे दोन प्रमुख घटक असून यावरच सगळे पुढचे अवलंबून असते. अनेकदा तर दोन्ही घटकांमुळे पुस्तकाचा आकार कमी-जास्त करावा लागतो. पुस्तक-निर्मितीचे एखादे पुस्तक वाचून निर्मिती जरी केली, तरी या गोष्टी प्रत्यक्ष कार्याला सुरवात केल्यानंतरच अनुभवता येतात. संत ज्ञानेश्वरांनी म्हटलेच आहे, एकच ओवी अनुभवावी..।
एक मात्र आहे, की पूर्वी मोठ्या आकारात असलेली अनेक पुस्तकं आज विज्ञानाच्या चमत्कारामुळे त्यांचा आकार लहान करता येणे शक्य झाले आहे.अगदी मुठीत मावेल इतक्या लहान आकारात "गीता" उपलब्ध आहे. यानंतरच्या टप्प्यात उल्लेखनीय प्रगती आणि विकास होऊन संगणकाचा शोध लागून हाच शोध माणसाच्या प्रगतीला पोषक ठरणारा अक्षरशः "टर्निंग पॉईंट" ठरला. आजकाल तर ई-पुस्तकं सुद्धा इंटरनेटवर दिसू लागली आहेत. सीडी,डिव्हीडीमध्ये मोठे पुस्तक सहजगत्या संग्रहित करता येते. पुस्तकंही इतिहासाप्रमाणेच अनेक वर्ष टिकतात, पुस्तक सातासमुद्रापार नाही गेले, तरी लेखकाला सातासमुद्रापार नेते किंवा लेखक सातासमुद्रापार नाही गेला, तरीही त्याचे पुस्तक त्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सातासमुद्रापार नेते. एकच आहे, पुस्तकाला भीती असते, ती 'कसर' पासून, अर्थात वाळवीपासून. ही वाळवी पुस्तक पोखरताना कोणतीही 'कसर' बाकी ठेवत नाही, सगळी कसर काढून घेते. यावर उत्तम उपाय म्हणजे संगणक (कॉम्प्यूटर) चा आधार घेणे...।
वर सांगितल्याप्रमाणे पुस्तक वाचनामुळे माणुस विद्वान होतो, जगात त्याची वाहवा होते. पुस्तकाचे एखादे पान जरी वाचले तरीही तेवढी विद्या प्राप्त होऊ शकते. म्हणतात नां - क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थंच चिन्तयेत्...। एक सुभाषित आठवले, ते सांगतो आणि वेळेअभावी विषयाला पूर्णविराम देतो...
सुभाषित असे आहे- स्वदेशेशु धनं विद्या विदेशेशु धनं मति। परलोके धनं धर्मः शीलं सर्वत्र वैधनं।(अर्थात, आपल्या देशात विद्या हेच धन असते, या धनाचे मूल्य विदेशात बुद्धी म्हणून केले जाते, तसेच चांगले चारित्र्य हे सर्वत्र धनासारखे असते.)

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012