मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

immune power लेबलसह पोस्ट दाखवत आहे

'कोरोना COVID 19" विरुद्ध लढा; प्रतिकारशक्ती वाढवणे आवश्यक

सध्या अवघं जग कोरोना मध्ये अक्षरशः अवघडलं आहे आणि हादरलं आहे. एक प्रकारचे हे जैविक युद्धच असल्याचे मानले जात आहे. जवळपास प्रत्येकालाच या कोरोना ने काम लावलंय...कोणत्याही कामाविना घरी बसणे, ते सुद्धा केवळ आराम करणे..हे सुद्धा एक कामच आहे असे मी मानतो... कोरोना अर्थात COVID 19 संदर्भात अद्याप कोणतीही लस उपलब्ध झालेली नसली, तरीही कोणत्याही रोगावर यशस्वीपणे मात करण्यासाठी प्रतिकारशक्ती उत्तम असणे ही बाब सर्वात महत्त्वाची आहे. अगदी परवाच मी संध्याकाळी दूध घ्यायला डेअरीत गेलो तेव्हा जवळपास अर्धा तास उशीरा गड्याने दूध आणले...गडी थोडा वयस्कर असल्यामुळे त्याला खांद्यावरून कॅन उतरवण्यासाठी मदत केली आणि कॅनचे झाकणही उघडून दिले. नेहमी दूध वाटप करणारे गृहस्थही तेवढ्यात घरातून माप घेऊन आले नी खुर्चीत विराजमान झाले...कॅनचे झाकण मी उघडले तेव्हा त्यांचा छोटा मुलगा समोरच होता. दुधात थोडा कचरा असल्याचे मी सांगितले. यावर, त्या गृहस्थांच्या मुलाने त्यांना सांगितले, "बाबा-बाबा दुधातला कचरा काढा बरका व्यवस्थित, यामुळे त्यांनी मुलाला प्रतिप्रश्न केला..कारे व्यवस्थित का काढायचा कचरा? यावर मुलगा उत्तरला, ...