मुख्य सामग्रीवर वगळा

'कोरोना COVID 19" विरुद्ध लढा; प्रतिकारशक्ती वाढवणे आवश्यक

सध्या अवघं जग कोरोना मध्ये अक्षरशः अवघडलं आहे आणि हादरलं आहे. एक प्रकारचे हे जैविक युद्धच असल्याचे मानले जात आहे. जवळपास प्रत्येकालाच या कोरोना ने काम लावलंय...कोणत्याही कामाविना घरी बसणे, ते सुद्धा केवळ आराम करणे..हे सुद्धा एक कामच आहे असे मी मानतो... कोरोना अर्थात COVID 19 संदर्भात अद्याप कोणतीही लस उपलब्ध झालेली नसली, तरीही कोणत्याही रोगावर यशस्वीपणे मात करण्यासाठी प्रतिकारशक्ती उत्तम असणे ही बाब सर्वात महत्त्वाची आहे. अगदी परवाच मी संध्याकाळी दूध घ्यायला डेअरीत गेलो तेव्हा जवळपास अर्धा तास उशीरा गड्याने दूध आणले...गडी थोडा वयस्कर असल्यामुळे त्याला खांद्यावरून कॅन उतरवण्यासाठी मदत केली आणि कॅनचे झाकणही उघडून दिले. नेहमी दूध वाटप करणारे गृहस्थही तेवढ्यात घरातून माप घेऊन आले नी खुर्चीत विराजमान झाले...कॅनचे झाकण मी उघडले तेव्हा त्यांचा छोटा मुलगा समोरच होता. दुधात थोडा कचरा असल्याचे मी सांगितले. यावर, त्या गृहस्थांच्या मुलाने त्यांना सांगितले, "बाबा-बाबा दुधातला कचरा काढा बरका व्यवस्थित, यामुळे त्यांनी मुलाला प्रतिप्रश्न केला..कारे व्यवस्थित का काढायचा कचरा? यावर मुलगा उत्तरला, अहो बाबा कचरा नाही काढला तर मग लोकांना कोरोना होईल नां...इतकं ते मिष्किल वयं होतं त्या मुलाचं " मात्र इथे या प्रसंगाचा उल्लेख करण्यामागे उद्देश हाच की पाहा अगदी लहान मुलांना सुद्धा कोरोनाविषयी जाणीव आहे, कोरोना काय आहे रे..हे त्या मुलाला विचारल्यावर तेवढं नाही सांगता आलं, पण आजुबाजुची परिस्थिती, सोशल मीडियावरील पोस्ट, घरात होणाऱ्या चर्चा याकडे त्याचं लक्ष असल्याचा हा परिणाम... आमच्या लहानपणी एखाद्याला टायफॉईड झाला तर गंभीर समजला जायचा आणि त्या व्यक्तीस शक्यतो हॉस्पिटलमध्येच अॅडमिट करत असत, त्या व्यक्तीच्या जवळही आम्हाला फिरकू देत नसत, तेव्हा इतकं गंभीर मानलं जात होता टायफॉईड. तोच टायफॉईड आता सामान्य झालाय जवळपास...औषधंही सहज उपलब्ध आहेत...नव्यानेच आलेल्या कोरोना अर्थात COVID 19 चे तसे नाही... शासन सर्वतोपरी त्यावर मात करण्याचा प्रयत्न करते आहे आणि सध्यातरी १४ एप्रिलपर्यंतच्या आखून दिलेल्या लॉकडाउन कालावधीत सगळ्यांनी घरीच थांबावे, शक्यतो बाहेर पडू नये हाच उपाय आहे. परंतु दररोजच्या बातम्यांवरून, अनेक नागरीक अजूनही ही बाब गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत हेच लक्षात येतंय. घरी थांबाल तर नंतर शक्यतो अशा प्रकारे घरी थांबायची वेळ येणार नाही हे येथे मुद्दाम नमूद करावेसे वाटते. दुसरे म्हणजे प्रतिकारशक्ती वाढवणे देखील महत्वाचे आहे. आजकाल काही झालं तरीही लगेच डॉक्टरांकडे धाव घेतली जाते. वयाची पंचे-चाळिशी गाठेपर्यंत तरी लगेच डॉक्टरांकडे जाऊ नये साध्या साध्या गोष्टींसाठी असे वाटते. प्रतिकारशक्ती ही वाढवावी कशी? हा प्रश्न अनेकांना पडला असावा...यासाठी नियमित व्यायाम, योगासने करणे आवश्यक आहे. किमान रात्री जेवताना दोन घास कमी खाऊन पोटात थोडी रिकामी जागा ठेवल्यास अपचनाचा त्रास कमी होईल, जेवल्यानंतर लगेच झोपू नये, थोडे सावकाश फिरावे. जेवणात/अन्न तयार करताना आले, लसूण, हिंग यांचा वापर करावा.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धुळे ,नंदुरबार व अकोला जिल्हापरिषदा आणि पंचायत समित्यांसाठी शांततेत मतदान- आज मतमोजणी

मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदभार स्वीकारला

मुंबई, ता. ११- महाराष्ट्राचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. ११) रात्री नऊच्या सुमारास मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. सर्व लोकांना सोबत घेऊन जाण्याचे आपले धोरण असून केवळ बोलण्याऐवजी कृतीवर भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राजभवनावरील शपथविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पवार यांनी नूतन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत मणिभवन आणि चैत्यभूमी येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना वंदन केले. यानंतर मंत्रालयात राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. मंत्रालयातील मिनी थिएटरमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केल्यानंतर मुख्यसचिव, अप्पर मुख्यसचिव, सचिव तसेच अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. सुमारे दीड तास ही बैठक चालली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. नागपूर येथे होणार्‍या आगामी हिवाळी अधिवेशनाचीही चर्चा करण्यात आली.

राहुल गांधी यांची मुंबई भेट...

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सन्माननीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवार दिनांक 1 मार्च 2013 रोजी मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, मुंबई शहरातील लोकप्रतिनिधी आणि काही निमंत्रितांशी चर्चा केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या टिळक भवन कार्यालयात ही बैठक घेण्यात आली. जयपूर येथे जानेवारी महिन्यात झालेल्या चिंतन शिबिरात राहुल गांधी यांनी प्रत्येक राज्यात जाऊन पदाधिका-यांशी चर्चा करण्याची घोषणा केली होती. पक्षातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी आज मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीशी चर्चा केली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने संघटनात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली. सकाळी 9 च्या सुमारास राहुल गांधी यांचे मुंबईत आगमन झाले. महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच महाराष्ट्र मंत्रिमंडळातील सन्माननीय सदस्यांनी राहुलजी गांधी यांचे मुंबई विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर राहुल गांधी थेट टिळक भवनला दाखल झाले. त्यांनी सर्वप्रथम दिवंगत नेते स्व...