मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जि.प. लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आठ मतदान केंद्रावर फेरमतदान जि.प., पं.स. क्षेत्रातील निवडणूक आचारसंहिता शिथिल

मुंबई, ता. 8 - राज्यातील 27 जिल्हा परिषदा व 305 पंचायत समिती क्षेत्रातील निवडणूक आचारसंहिता शिथिल करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली आहे. याचबरोबर 8 मतदान केंद्रांवर 12 फेब्रुवारी 2012 रोजी फेरमतदान घेण्याचा निर्णय देखील राज्य निवडणूक आयोगाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून मतमोजणी संपेपर्यंत लागू असते. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या मतदानाची प्रक्रिया संपली असली तरीही मतमोजणी 17 फेब्रुवारी 2012 रोजी होणार आहे. यामुळे मतदान आणि मतमोजणीतील बराच कालावधी लक्षात घेऊन आणि विकास कामांमद्ये अडथळा येऊ नये यासाठी संबंधित जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या क्षेत्रातील आचारसंहिता शिथिल करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या चार तालुक्यात 12 फेब्रुवारी रोजी मतदान असल्यामुळे तेथे मतदान प्रक्रिया संपेपर्यंत आचारसंहिता लागू राहील. तसेच महानगरपालिका निवडणुकांची आचारसंहिता मात्र 17 फेब्रुवारीपर्यंत लागू राहील...