मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

अब्दुल कलाम लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अद्वितीय व्हा आणि चांगला विचार करा- कलाम

भुवनेश्वर, ता. 4 - अद्वितीय व्हा आणि चांगला विचार करा तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान कार्यात स्वतःस झोकुन द्या. असे आवाहन माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी आज येथे शाळेच्या विद्यार्थ्यांना केले. येथील केआयआयटी विद्यापीठाच्या प्रांगणात 99 व्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या उद्घाटनकार्यक्रमात ते बोलत होते. मंगळवारी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पाच दिवस (7 जानेवारीपर्यंत) चालणाऱ्या या कार्यक्रमात नोबेल विजेत्यांसह 15,000 प्रतिनिधींपेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी होत आहेत. यावेळी श्री. कलाम म्हणाले की युवकांनी आपल्या स्वप्नातील कल्पनेनुसार कार्य करावे. सध्याचा काळ जोखीम पत्करण्याचा आहे. येणाऱ्या पीढीचे भविष्य उज्ज्वल असून त्यांचीही विशिष्ट स्वप्न आहेत. कठोर परीश्रम करा आणि सर्व समस्यांचे निराकरण स्वतःच करण्याचा प्रयत्न करा. चांगली पुस्तकं लिहा, चांगला माणूस बना आणि आपला मित्र वाटावा असे चांगले शिक्षक व्हा, असेही श्री. कलाम म्हणाले. एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की विज्ञानासाठी भरपूर पैसा लागतो आणि पैसा हा राजकारण्यांकडून येतो.