इंदूर ( ता. ३ फेब्रु. ): मुलांना मिळालेलं पारितोषिक कोणतंही असो, त्यांचं कौतुक केलच पाहिजे. मुलांना त्यांना मिळालेल्या पारितोषिकाचं आईवडिलांनी केलेलं कौतुक म्हणजे दुधावरच्या सायीवर घातलेल्या पिठीसाखरेसारख्या आनंदासारखाच असतो. या शब्दात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी, येथील महाराष्ट्र साहित्य सभेच्या आयोजित पारितोषिक वितरण सोहळ्याचे कौतुक केले. येथील महाराष्ट्र साहित्य सभेच्या ५५ व्या शारदोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील यशस्वी प्रतिभावंतांना प्रीतमलाल दुवा सभागृहात शिवशाहीर तथा श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, सध्याचा काळ हा स्पर्धेचा असून कोणत्याही स्पर्धेत आता यश संपादन करणे वाटते तेवढे सोपे राहिले नाही. मात्र प्रयत्न केल्यास यश हे पदरात पडतेच, पालकांनी मुलांचं यश कितीही लहान स्वरुपात असलं तरीसुद्धा त्याचं कौतुक अर्थात appreciation हे केलंच पाहिजे, कष्टाने मिळविलेल्या अशा गुणांचा अंगीकार केला पाहिजे. प्रतिभावंतांच्या या कर्तृत्वावर महाराष्ट्र साहित्य सभेने