मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Washim लेबलसह पोस्ट दाखवत आहे

वाशिम जिल्हा परिषद व 6 पंचायत समित्यांसाठी 22 डिसेंबर रोजी मतदान

मुंबई दि. 29 – वाशिम जिल्हा परिषद व त्या अंतर्गत असलेल्या 6 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज जाहीर केला आहे. यानुसार वाशिम जिल्हा परिषदेबरोबरच कारंजा, मंगरुळपीर, मानोरा, मालेगाव, रिसोड आणि वाशिम या पंचायत समित्यांसाठी 22 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या कार्यक्रमानुसार मंगळवार दि. 3 डिसेंबर 2013 ते शनिवार दि. 7 डिसेंबर 2013 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार असून सोमवार, दि. 9 डिसेंबर 2013 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक जेथे अपिल नाही तेथे शनिवार दि.14 डिसेंबर 2013 व जेथे अपिल आहे तेथे बुधवार दि. 18 डिसेंबर 2013 हा असून रविवार दि. 22 डिसेंबर 2013 रोजी मतदान घेण्यात येईल. मतमोजणी दि. 23 डिसेंबर 2013 रोजी करण्यात येऊन निवडून आलेल्या सदस्यांची नावे मंगळवार दि. 24 डिसेंबर 2013 रोजी प्रसिध्द करण्यात येतील. सार्वत्रिक निवडणुका होत असलेल्या वाशिम जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समिती क्षेत्रात आज रात्री 12.00 वाजल्यापासून आचारसंहिता लागू होईल व ...