मुंबई, दि. 23 मार्च : राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागाला समान न्याय तसेच समाजातील सर्व घटकांना विकासाची समान संधी देणारा असा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सादर केला आहे, अशा शब्दांत सार्वजनिक बांधकाम तथा पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सन 2011-12 चा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर केला. त्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री. भुजबळ यांनी म्हटले आहे की, अर्थसंकल्पात राज्यातील सर्व घटकांच्या विकासाचे सूतोवाच करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी तीन लाखांपर्यंत शून्य ते 2 टक्के व्याजदराने कर्ज देण्याचा निर्णय घेतानाच कृषी संजीवनी योजनेची घोषणाही स्तुत्य आहे. दोन लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचा निर्धार करून त्या दृष्टीने पाटबंधारे विभागासाठी सुमारे 6300 कोटी तर जवाहर विहीर योजनेसाठी 221 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. फलोत्पादन वृध्दी, निर्यात केंद्रे, फार्म पॅक हाऊसिंग या बरोबरच सिंचन प्रकल्प, महाराष्ट्र सुजल योजना, रोजगार हमी योजना यांच्यासाठी भरीव तरतूद करून राज्याती...