मुख्य सामग्रीवर वगळा

अंधेरी येथील शिल्पग्रामसाठी एमटीडीसीची महापालिकेकडे जागा हस्तांतराची मागणी

मौजे मजासगाव, ता. अंधेरी येथे उपलब्ध असलेल्या 15 एकर जागेवर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून `शिल्पग्राम` विकसित करण्यात येणार आहे. तथापि, सातत्याने पाठपुरावा करूनही ही जमीन मुंबई महानगरपालिकेने महामंडळाकडे अद्यापही हस्तांतरित व केल्यामुळे या कामासाठी केंद्राकडून आलेला 5 कोटी 55 लक्ष रुपयांचा निधी वापरता येऊ शकलेला नाही. ही जागा महामंडळाला देण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी सूचना पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी महापालिकेचे आयुक्त सुबोध कुमार यांना केली.
सदर जमिनीचे मूळ आरक्षण हे मनोरंजन मैदान असे होते. मात्र नगरविकास विभागाने ते बदलून `शिल्पग्राम` असे केले आहे. या जमिनीच्या ताब्यासाठी सन 2007पासून महामंडळाकडून महापालिका आयुक्तांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती यावेळी एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर यांनी दिली. हरियाणातील सूरजकुंडच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त असा शिल्पग्राम प्रकल्प उभारण्याचा महामंडळाचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. जोगेश्वरी गुंफा जवळच असल्याने या शिल्पग्रामला त्याचा निश्चितच लाभ होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
त्यावर मुंबई महापालिका आणि पर्यटन महामंडळ यांनी एकत्रित चर्चा करून या प्रकरणी सामंजस्य करार सदृश बोलणी करता येऊ शकेल आणि महसूल उत्पन्न अथवा भाडेकरार आदी निकषांवर जागा हस्तांतरणाबाबत सर्व तांत्रिक बाबींवर सकारात्मक तोडगा काढण्यात येईल, असे सुबोध कुमार यांनी सांगितले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.