मुख्य सामग्रीवर वगळा

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सर्वसामान्यांसाठी संजीवनी ठरणार: सोनिया गांधी

नागपूर, दि. 21 नोव्हेंबर 2013: राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सर्वसामान्यांसाठी संजीवनी ठरणार आहे. आई जन्म देते तर ही योजना गरजूंना पूनर्जन्म देईल, असे प्रतिपादन यूपीए आणि काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांनी केले आहे. नागपूर येथील कस्तूरचंद पार्कवर राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे विस्तारीकरण आणि राज्यपातळीवरील लोकार्पण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. श्रीमती सोनिया गांधी यांनी गुरुवार दि. 21 नोव्हेंबर 2013 लाखो नागरिकांच्या साक्षीने या योजनेचे उद्घाटन केले. मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय मंत्री श्री प्रफुल्ल पटेल, आरोग्य मंत्री श्री सुरेश शेट्टी आणि आरोग्य राज्य मंत्री श्रीमती फौजिया खान कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.श्री माणिकराव ठाकरे, खा.श्री मुकूल वासनिक, नागपूरचे पालकमंत्री श्री शिवाजीराव मोघे, रोहयो मंत्री श्री नितीन राऊत, अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री अनिल देशमुख, राज्यमंत्री श्री राजेंद्र मुळक, खा.श्री विलास मुत्तेमवार आदी नेते देखील याप्रसंगी उपस्थित होते. आजवर ही योजना पथदर्शी प्रकल्प म्हणून राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये सुरू होती. या योजनेचे सामान्यांना मिळालेले लाभ लक्षात घेता ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्रातील आघाडी सरकारने घेतला आहे. या योजनेचे लोकार्पण केल्यानंतर यूपीए अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी भाषणासाठी उभ्या झाल्या तेव्हा लाखोंच्या जनसमुदायाने “सोनिया गांधी जिंदाबाद, सोनिया गांधी आगे बढो”चा एकच जयघोष केला. सभास्थळावर आल्यानंतर त्यांनी या योजनेच्या पथदर्शी प्रकल्पाचा लाभ घेतलेल्या 78 रूग्णांशी थेट संवाद साधला. सदर रूग्णांशी झालेली चर्चा गहिवरून आणणारी होती, असे श्रीमती गांधी म्हणाल्या. दुर्दैवाने एखादा गंभीर आजार जडला तर अनेकांना परिस्थितीअभावी उपचार घेणे शक्य होत नसे. सर्वसामान्यांची ही अडचण लक्षात घेऊन यूपीए सरकारने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना लागू केल्याचे श्रीमती सोनिया गांधी यांनी सांगितले. या योजनेंतर्गत केवळ शस्त्रक्रियाच होणार नसून, रूग्णाचा औषधोपचार, भोजन आणि त्याला घरापर्यंत पोहोचविण्याचीही तरतूद असल्याचे त्या म्हणाल्या. श्रीमती सोनिया गांधी यांनी यावेळी केंद्रातील डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार आणि राज्यातील श्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारच्या कामाचे कौतूक केले. आयुष्यातील विविध जबाबदा-यांचे यशस्वीरित्या वहन करायचे असेल तर सुदृढ आरोग्याची गरज आहे. त्यामुळेच गावा-खेड्यात राहणा-या नागरिकांना चांगली आरोग्य सेवा पुरविण्यासाठी यूपीए सरकार कटिबद्ध असून, सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक दर्जेदार करण्यासाठी ठोस पावले उचलली जात असल्याचे त्या पुढे म्हणाल्या. तत्पूर्वी मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यूपीएने नागरिकांना केवळ सुविधाच दिल्या नाहीत तर थेट कायदेशीर अधिकारच प्रदान केल्याचे सांगितले. रोजगार हमी योजनांसारख्या अनेक योजनांची सुरूवात महाराष्ट्रात झाली आणि त्यांची उपयोगिता लक्षात घेऊन अशा योजना देशपातळीवरही राबविल्या गेल्या, असे ते म्हणाले. केंद्रीय मंत्री श्री प्रफुल्ल पटेल यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केले. ते म्हणाले की, श्रीमती सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली यूपीएने अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने सर्वसामान्यांचे हित समोर ठेवूनच योजना आणल्या आहेत. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रीमती सोनिया गांधी यांनी या योजनेच्या कार्डांचे वितरण केले. श्रीमती गांधी यांच्यासह सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी या योजनेच्या लाभार्थ्यांनाच निमंत्रित करण्यात आले होते. त्यामध्ये बालकांचाही समावेश होता. श्रीमती सोनिया गांधी यांनी या चिमुकल्यांची आस्थेने विचारपूस केली. योजनेचे कार्ड वितरण करतेवेळीही त्यांनी तिथे आलेल्या महिलांशी मनमोकळा संवाद साधला. दरम्यान, जनसामान्यांच्या हिताच्या असंख्य योजना लागू केल्याबद्दल काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांचे आभार मानण्यासाठी या कार्यक्रमाला संपूर्ण विदर्भातून सुमारे दोन लाखांहून अधिक नागरिक व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्य मंत्री श्री सुरेश शेट्टी तर आभार प्रदर्शन आरोग्य राज्य मंत्री श्रीमती फौजिया खान यांनी केले. याप्रसंगी संपूर्ण राज्यातील अनेक मंत्री, खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते असे सचिन सावंत,प्रवक्ता व प्रभारी, कम्युनिकेशन्स विभाग यांनी कळविले आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012