मुख्य सामग्रीवर वगळा

बाबांच्या रुपात लाभले आबा...

संपूर्ण महाराष्ट्रातच मागास जिल्हा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यास आर. आर. पाटील उर्फ आबा यांची पुन्हा एकदा पालकमंत्री या नात्याने नियुक्ती झाली आहे. जिल्ह्यास आबा हे बाबांच्या रुपात अर्थातच खरोखर पालकाच्या, वडिलांच्या रुपात लाभले आहेत.
खरंतर दुर्गम अशा भागात, ते सुद्धा मागास भागात जाण्यास, जिथे नक्सलवादी केव्हा, कधी, कुठून कसे येतील आणि हल्ला करतील हे सांगता येत नाही, अशी ख्याती आणि भीती तिथे असलेल्या अधिकाऱ्यांना वाटत आहे, अशा भागाची जबाबदारी तेही पालकमंत्री पदासारखी महत्वाची जबाबदारी स्वीकारणे म्हणजेच धाडस आणि धारिष्ट्याचे आहे.  कोणतीही सुरक्षा व्यवस्था न घेताच बाईकवरून फिरून ग्रामस्थांकडून वस्तूस्थिती जाणून घेणे ही छोटी गोष्ट नाही. शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे, पोलिस कर्मचारी-अधिकारी अडचणी सोडविणे आदी गोष्टींमुळे गडचिरोली जिल्ह्याचा कायापालट नक्की होईल, परीसरातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होऊन वाईट मार्गाला लागलेले युवक पुन्हा एकदा समाजात येऊन ताठ मानेने जगायला शिकतील, हाच विश्वास, हीच अपेक्षा.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012