मुख्य सामग्रीवर वगळा

गेले कुठे ते दिवस...?

खबरदार जर टाच मारूनी जाशील पुढे चिंधड्या..उडवीन राई राई एवढ्या...!!! कवितेतल्या या ओळींची आज आठवण झाली...निमित्त आहे भारत-पाकिस्तान यांच्यात नुकत्याच झालेल्या चर्चेचे..! या कवितेची रचना करण्यात आली, तेव्हाचा काळ म्हणजे खरंच बहुदा सुवर्णयुगच म्हणावा लागेल...!!
सीमेवर सैनिक शत्रुशी लढताना, शत्रूने आपल्या हद्दीतून पुढे कूच करण्याचा प्रयत्न करण्याच्या प्रयत्नात असताना देशभक्त स्वाभिमानी भारतीय शिपायाने शत्रूला तो एकही पाऊल आणखी पुढे गेल्यास अगदी मोहरी एवढे त्याचे तुकडे करून टाकेन..असा सज्जड दम भरणारा शिपाई...। असा या रचनेचा आशय आहे. आजकाल याप्रकारच्या नवीन कविता सुद्धा ऐकिवात नाहीत. आजकाल तर आपणच एकमेकांचे पाय मागे ओढत आहोत, धीर देण्याऐवजी घाबरलेल्या व्यक्तीला आणखी घाबरवत आहोत असे चित्र निर्माण झाले आहे. भारत आणि पाकिस्तान या देशांच्या सीमेवर नेहमीच काही ना काही सुरूच असते. भारत स्वतः कधीच काही करत नाही, हे सुद्धा खरंय. परंतु खोड काढण्यात पाकिस्तान वरचढ आहेच. नुकतीच भारतीय सीमा सुरक्षा दल आणि पाकिस्तानमधील चर्चा झाली. यावेळी दोन्ही देशांमध्ये असलेला तणाव कमी करण्यासाठी काही उपाययोजनांची अंमलबजावणी निश्चित करण्यात आली आहेत. यानुसार वाघा सीमेवर अनेक वर्षांपासून दररोज होणारी परेड आणि संध्याकाळी ध्वज उतरवताना होणार्‍या अत्यंत कडक हालचाली (कवायत) आता मंदावणार आहेत. यात साधेपणा आणि सहजता येणार आहे. त्यामुळे सामान्य माणसाच्या मनात या कवायतीबद्दल असलेलं चित्र बहुदा पुसलं जाईल.
सीमेवर होणारा अनावश्यक गोळीबार थांबविणे, सीमा चुकून ओलांडणार्‍यांना गोळ्या न घालणे, सीमेलगत बांधकामे ते सुद्धा बेकायदेशीर बांधकामे न करणे, तस्करीला आळा घालणे या प्रमुख उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे...! खरंतर, अशा प्रकारच्या घटना सीमेवर घडत आहेतच हे निर्विवाद सत्य असल्याला यामुळे पुष्टी मिळाली आहे. याच कारणावरून सुद्धा भारताने पाकिस्तानला जाब विचारून कारवाई करणे आणि आपल्या सैनिकांना शाबासकी देऊन त्यांच्या कृतीमागे खंबीरपणे सरकारने उभे राहणे देशातल्या नागरिकांना अपेक्षित आहे. सीमावर्ती भागात घुसखोरी होत असल्यास सैन्याला एकही गोळी सरकारच्या परवानगीशिवाय मारता येत नाही. एखाद्या सैनिकाने असे केल्यास त्याला चौकशीला सामोरे जावे लागते. परिणामी सैनिकाला सहजासहजी कोणताही निर्णय घेता येत नाही. वरहुकुम, आता तर चर्चेतच ठरले आहे, की "चुकून" सीमा ओलांडणार्‍यांना गोळ्या घालू नये. यामुळे पाकिस्तानकडून बहुदा अशा चुका वारंवार घडतील, एखाद्या घुसखोरास पकडल्यास चुकून असे झाल्याचे सांगितले की त्याची सुटका...। बिचार्‍या सैनिकांना देखील बघ्याची भूमिका घ्यावी लागेल. कारण तसा आदेशच असल्यामुळे ते सुद्धा करणार काय, काय करू शकणार? आणि ते हे दुःख सांगणार कोणाला..? शासनाच्या या निर्णयाचा शासनाने पुन्हा विचार करावा, हीच अपेक्षा.
त्रस्त समंधा शांत हो..त्रस्त समंधा शांत हो..शत्रुचा संहार करूनी, शत्रुचा संहार करूनी नंतर निवांत हो..निवांत हो...या ओळी लिहिल्या नाही तर औरच..

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धुळे ,नंदुरबार व अकोला जिल्हापरिषदा आणि पंचायत समित्यांसाठी शांततेत मतदान- आज मतमोजणी

मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदभार स्वीकारला

मुंबई, ता. ११- महाराष्ट्राचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. ११) रात्री नऊच्या सुमारास मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. सर्व लोकांना सोबत घेऊन जाण्याचे आपले धोरण असून केवळ बोलण्याऐवजी कृतीवर भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राजभवनावरील शपथविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पवार यांनी नूतन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत मणिभवन आणि चैत्यभूमी येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना वंदन केले. यानंतर मंत्रालयात राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. मंत्रालयातील मिनी थिएटरमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केल्यानंतर मुख्यसचिव, अप्पर मुख्यसचिव, सचिव तसेच अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. सुमारे दीड तास ही बैठक चालली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. नागपूर येथे होणार्‍या आगामी हिवाळी अधिवेशनाचीही चर्चा करण्यात आली.

राहुल गांधी यांची मुंबई भेट...

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सन्माननीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवार दिनांक 1 मार्च 2013 रोजी मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, मुंबई शहरातील लोकप्रतिनिधी आणि काही निमंत्रितांशी चर्चा केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या टिळक भवन कार्यालयात ही बैठक घेण्यात आली. जयपूर येथे जानेवारी महिन्यात झालेल्या चिंतन शिबिरात राहुल गांधी यांनी प्रत्येक राज्यात जाऊन पदाधिका-यांशी चर्चा करण्याची घोषणा केली होती. पक्षातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी आज मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीशी चर्चा केली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने संघटनात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली. सकाळी 9 च्या सुमारास राहुल गांधी यांचे मुंबईत आगमन झाले. महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच महाराष्ट्र मंत्रिमंडळातील सन्माननीय सदस्यांनी राहुलजी गांधी यांचे मुंबई विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर राहुल गांधी थेट टिळक भवनला दाखल झाले. त्यांनी सर्वप्रथम दिवंगत नेते स्व...