मुंबई, ता. २२- विक्रोळी येथे रविवारी झालेल्या रेल्वे अपघातात तीन व्यक्ती ठार झाल्याची शासनाने गंभीर दखल घेतली असून पंधरा दिवसात यासंदर्भात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्यासह महानगरपालिका तसेच रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकार्यांची बैठक घेण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज दिली.
विक्रोळी येथील रेल्वे अपघात प्रकरणी मंत्रालयातील दालनात श्री. भुजबळ यांनी आज बैठक घेतली. दुर्लक्ष करणार्यांवर गुन्हे दाखल करण्याचे अधिकार राज्य शासनास असल्याचे भुजबळ यांनी रेल्वेला बजावले. यावेळी भुजबळ म्हणाले की, मुंबई महानगरमध्ये दरवर्षी सरासरी चार हजारपेक्षा अधिक व्यक्ती रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडतात. सुमारे २५०० व्यक्ती अपंग होतात. म्हणजेच दररोज सरासरी ११ ते १२ व्यक्ती मृत्युमुखी पडतात, पाच ते सहा व्यक्ती अपंग होतात. रेल्वे प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी. विक्रोळीसारखी अशी जी ठिकाणे आहेत त्या सर्व ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. विक्रोळी येथील या ठिकाणी ओव्हरब्रिज उभारण्याची प्रक्रिया येत्या पंधरा जानेवारीपर्यंत पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरवात करावी. यासाठी आवश्यक ते सर्वेक्षणही पूर्ण व्हावे. बैठकीस गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यासह रेल्वेचे प्रशासन अधिकारी, वरिष्ठ पोलिस अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान काल (ता. २१) विक्रोळी स्थानकात संतप्त नागरिकांनी रेल रोको आंदोलन केल्यामुळे रेल्वेची उपनगरी व मेल एक्सप्रेस सेवा सुमारे चार तास ठप्प झाली होती. गृहमंत्री आर. आर. पाटील, रेल्वे पोलिसांनी याप्रश्नी दिलेल्या आश्वासनानंतर रेल रोको आंदोलन मागे घेण्यात आले होते.