धुळे जिल्ह्यात अनेक शिक्षक, शासकीय कर्मचारी मॅनेज् करून अर्थातच बोगस बहिरे झाल्याचे वृत्त आहे. सामान्य नागरिकांप्रमाणेच आता शासनाच्या सवलती मिळवण्यासाठी शासकीय कर्मचारी आणि सर्वात आदराने पाहिले जाणारे काही शिक्षक देखील सरसावले आहेत. अशा सर्व बोगस, खोटा दाखला देऊन, अहवाल सादर करून शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून खोटे बहिरे बनणार्या कर्मचार्यांच्या मागण्यांसाठी शासनानेही बहिरे होऊन दुर्लक्ष करावे म्हणजे खरेपणा ऐकू येईल, हीच अपेक्षा!
मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.