भारत आणि रशियात नुकतेच विविध ३० करार झाले आहेत. यात प्रामुख्याने रशियाचे अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनीही रशियाच्या अर्थकारणाच्या दृष्टीनेच भर दिलेला दिसतो. दोन्ही देशांमध्ये येत्या दोन वर्षात सुखोई सारखीच लढाऊ विमानांची पाचवी पिढी तयार करण्याचा प्रस्ताव असून सन २०३० पर्यंत अशा प्रकारची सुमारे तीनशे विमाने तयार होतील. ही विमाने तिसर्या देशास दोन्ही देश मिळून विकणार आहेत. यापूर्वी अशाच प्रकारे ब्रह्मोस मिसाईल देखील तयार करण्यात आले आहे.
यासह अणुभट्टी तंत्रज्ञान क्षेत्रातीस सहकार्याचा देखील महत्वपूर्ण करार करण्यात आला. भारतातील वैज्ञानिकांचे एक पथक लवकरच रशियात जाणार आहे. एक पथक यापूर्वीच रशियात दाखल झाले असून डिझाईन आणि संशोधन दोन्ही देशांच्या वैज्ञानिकांनी संयुक्तपणे सुरू केले देखील आहे.