(वृत्तसंस्था)- अनेक वर्षांपासून पाकिस्तानमध्ये तुरूंगात जीवंतपणीच जगण्याची आशा मावळलेल्या भारतीय वंशाच्या सरबजितसिंग याच्या जगण्याच्या आणि तुरूंगातून सुटका होण्याच्या आशेला पालवी फुटली आहे. त्याच्या वकीलांनी दिलेल्या माहितीमुळे त्याच्या कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.
काही वर्षांपूर्वी लाहोर येथील बॉम्बस्फोट प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सरबजितसिंग याला न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे. संबंधित प्रकरणात मनजितसिंग ही व्यक्ती खरा आरोपी असल्याचे सरबजितसिंग याचे वकील ओवेस शेख यांनी सांगितले असून ते लवकरच तसे पुरावे देखील न्यायालयात सादर करणार आहेत. मनजितसिंग सुमारे तीन वर्षे कॅनडा पोलिसांच्या ताब्यात असून, तो बॉम्बस्फोटाच्या वेळी लाहोरमध्ये होता असे पुरावे सापडल्याचे शेख यांनी सांगितले. सरबजितसिंग याने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासाठी भेटवस्तू बनविल्या असून त्या त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येतील असेही ते यावेळी म्हणाले.