मुंबई, ता. ३ - शब्दशृंगारात न्हालेल्या लावणीला मराठी चिरंतन गुंजत ठेवणारा आणि मराठी चित्रपट गीतांना आपल्या शब्दांनी सजवणारा गीतसम्राट हरपला आहे. अशा शब्दात गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले आहे.
आपल्या शोकसंदेशात श्री. पवार म्हणाले, की खेबुडकरांच्या शब्दांनी भक्तांना दत्तगुरुंचं दर्शन घडवं, लहानग्यांना निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपल्याचं सांगितलं, कोल्हापूरच्या लवंगी मिरचीचा ठसका दाखवला, तर बुगडी सांडल्याची चुगली न करण्याची गळ देखील घातली. पिंजरा, सामना, साधी माणसं या चित्रपटातील त्यांच्या गीतांनी मराठी चित्रपटसृष्टीवर ठसा उमटवला आहे. मराठी चित्रपटगीतांना लोकप्रिय करणार्या गीतकारांमध्ये त्यांचे स्थान अत्युच्च होते. त्यांच्या लेखणीतून साकारलेली भक्तीगीते, भावगीते, लोकगीते, चित्रपटगीते मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवत राहील. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटगीते पोरकी झाली आहेत.