मुख्य सामग्रीवर वगळा

पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धांचे जल्लोषात उद्घाटन

कोल्हापूर, दि. १४ फेब्रुवारी: राष्ट्रीय व राज्य स्तरावर क्रीडा संघटनांचा प्रतिनिधी म्हणून काम करीत असताना व्हॉलीबॉलचा दर्जा उंचावण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असून त्यासाठी युवा खेळाडूंकडूनही सहकार्य आणि प्रयत्नांची साथ आवश्यक आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू संजय नाईक यांनी आज केले. शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर क्रीडा संकुलात पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ व्हॉलीबॉल (पुरूष) स्पर्धेचे उद्घाटन श्री. नाईक यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कुलगुरू डॉ. एन.जे. पवार अध्यक्षस्थानी; तर प्र-कुलगुरू डॉ. ए.एस. भोईटे प्रमुख उपस्थित होते. यावेळी कुलसचिव डॉ. डी.व्ही. मुळे, बीसीयुडी संचालक डॉ. ए.बी. राजगे वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, विद्यापीठाच्या क्रीडा व शारिरीक सांस्कृतिक मंडळाचे सदस्य डॉ. एस.एस. हुंसवाडकर, शांताराम माळी, महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब सूर्यवंशी, रेफ्री मंडळाचे समन्वयक डॉ. सुनील चव्हाण, पी.एस. पंत आणि अतुल पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मुंबई व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव आणि महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटनेचे प्रादेशिक सचिव असलेले श्री. संजय नाईक म्हणाले, खेळामध्ये राजकारण करणाऱ्या प्रवृत्ती शिरल्यामुळे मूळ खेळ आणि खेळाडू या दोहोंवर त्याचा विपरित परिणाम होतो. ही बाब लक्षात घेऊन व्हॉलीबॉल संघटनेच्या माध्यमातून खेळाडूंची निवड पारदर्शकपणे करण्यावर भर दिला असून १४ ते २१ वयोगटातील संघनिवड अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली. वरिष्ठ वयोगटातील निवडही त्याच धर्तीवर करण्यात येईल. क्रीडापटूंना विशेषतः व्हॉलीबॉल खेळाडूंना शासकीय नोकरीत प्राधान्य देण्याबाबतही शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. सन १९८३-८४मध्ये अमरावती विद्यापीठाच्या व्हॉलीबॉल संघामधून शिवाजी विद्यापीठात खेळाडू म्हणून आल्याच्या आठवणीलाही श्री. नाईक यांनी उजाळा दिला. अध्यक्षीय भाषणामध्ये कुलगुरू डॉ. पवार यांनी विद्यार्थ्यांनी निकोप स्पर्धेचा आनंद लुटावा आणि कोल्हापुरातून परत जात असताना चांगल्या आठवणींचा ठेवा आपल्यासोबत न्यावा, असे आवाहन केले. सुवर्णमहोत्सवी शिवाजी विद्यापीठात अनेक चांगले विभाग, संग्रहालये आहेत; परिसरात उत्तम जैवविविधता आहे, त्यांची पाहणी करावी, असेही त्यांनी सांगितले. यावेळी संजय नाईक यांच्या हस्ते असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (एआययू) च्या ध्वज तर कुलगुरू डॉ. पवार यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वज फडकविण्यात आला. यजमान शिवाजी विद्यापीठ संघाचा कप्तान दिग्विजय साळुंखे याने सर्व खेळाडूंना शपथ दिली. यावेळी कुलसचिव डॉ. डीव्ही. मुळे यांनी स्वागत केले. क्रीडा विभागप्रमुख पी.टी. गायकवाड यांनी आभार मानले. सहाय्यक कुलसचिव आलोक जत्राटकर यांनी सूत्रसंचालन केले

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012