नुकत्याच पार पडलेल्या क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेच्या चषकाबद्दल सध्या दावे-प्रतिदावे सुरू आहेत. पूर्वविजेत्या श्रीलंकेतून आलेला विश्वचषक अद्याप आपल्याच ताब्यात असल्याचे कस्टम विभागाने म्हटले आहे. तर आयसीसी आणि बीसीसीआय ने विजेत्या भारतीय संघास देण्यात आलेला चषकच खरा विश्वचषक असल्याचे म्हटले आहे. विविध वृत्तवाहिन्यांसह तज्ज्ञ मंडळी याबाबत विविध निष्कर्श काढत असून आयसीसी अध्यक्षांपासून कस्टम विभागाच्या वरिष्ठांपर्यंत सगळेच विविध विधाने करीत आहेत. हा चषक श्रीलंकेतून भारतात आणला गेल्यानंतर याची कस्टम ड्युटी २२ लाख रूपये देऊन चषक नेण्याबाबत सूत्रांना कळविण्यात आले होते. यानंतर विचाराअंती १५ लाख रूपये भरून चषक नेण्याबाबत कळविण्यात आल्याचे कस्टम विभागातर्फे सांगण्यात आल्याचे वृत्त आहे. वास्तविक इतका घोळ घालण्याऐवजी गत विश्वचषक विजेत्या श्रीलंका संघाच्या पदाधिकार्यांना पाचारण करून विश्वचषकाचे खरे-खोटे सहज करता येणे शक्य आहे. याशिवाय कस्टम विभागाने आपल्या विधानाची सत्यता पडताळून दाखविण्यासाठी चषक श्रीलंकेतून आल्यानंतरची तयार झालेली कागदपत्रं अथवा पावती लोकांसमोर ठेवून वास्तव सामोरे ...