मुंबई, दि. 20 जानेवारी 2014: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार घोषित करण्याच्या काँग्रेस पक्षाच्या नियोजित कार्यक्रमानुसार राष्ट्रीय पातळीवरील पहिली यादी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणे अपेक्षित असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांची मोठी संख्या असेल, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.श्री माणिकराव ठाकरे यांनी दिली आहे.
दि. 20 जानेवारी 2014 रोजी टिळक भवन मुंबई येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.श्री माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य निवड मंडळाची बैठक झाली. या बैठकीला मंडळाचे सदस्य मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खा.श्री गुरूदास कामत, मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रा.श्री जनार्दन चांदूरकर, विधान परिषदेचे सभापती श्री शिवाजीराव देशमुख, माजी मुख्यमंत्री श्री अशोक चव्हाण, वनमंत्री श्री पतंगराव कदम, श्री सुरूपसिंग नाईक, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष आ.श्री राजीव सातव, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती कमलताई व्यवहारे, सेवादलचे अध्यक्ष श्री चंद्रकांत दायमा, इंटकचे अध्यक्ष आ.श्री जयप्रकाश छाजेड, एनएसयुआयचे अध्यक्ष श्री शिवराज मोरे उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आ.श्री माणिकराव ठाकरे म्हणाले की, या बैठकीत राज्यातील सर्वच्या 48 लोकसभा मतदारसंघातील राजकीय समिकरणे व परिस्थितीवर विचारविनिमय करण्यात आला. परंतु, काँग्रेसने नेहमीच धर्मनिरपेक्ष पक्षांना सोबत घेऊन समोर जाण्याची काँग्रेसची भूमिका घेतली आहे व ती आजही कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप-बहुजन महासंघ, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, बहुजन विकास आघाडीसोबत मिळून निवडणूक लढण्यास प्रदेश काँग्रेसचे निवड मंडळ अनुकूल आहे. विविध पक्षांसोबत आघाडीचा निर्णय घेणा-या संरक्षण मंत्री श्री ए. के. अॅन्थनी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरील समितीकडे तसा अहवाल देखील रवाना करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्तरावरून बोलणी करण्याची परवानगी मिळाल्यानंतर लगेच उपरोक्त समविचारी पक्षांशी जागावाटपाची बोलणी केली जाईल, असेही आ.श्री ठाकरे म्हणाले.
नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प स्थळाला भेट देऊन विमानतळाच्या सज्जतेचा (Readiness) आढावा घेतला. यापूर्वी नवी मुंबई विमानतळ येथे ११ ऑक्टोबर २०२४ रोजी भारतीय हवाई दलातर्फे घेण्यात आलेली इन्स्ट्रूमेन्ट लँडिंग चाचणी आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी इंडिगोतर्फे घेण्यात आलेली प्रवासी विमान लॅंडिंग चाचणी यशस्वीरीत्या पार पडली होती. या प्रसंगी विपिन कुमार, (भा. प्र. से.) अध्यक्ष, भारतीय विमानतळ प्राधिकरण, श्री. प्रकाश निकम, प्रादेशिक संचालक, नागरी विमान वाहतूक सुरक्षा मंडळ (BCAS), श्री. विजय सिंघल, (भा. प्र. से.), उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्री. शान्तनु गोयल, (भा. प्र. से.), सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्रीमती गीता पिल्लई, मुख्य महाव्यवस्थापक (परिवहन व विमानतळ), सिडको आणि नवी मुंबई इंटरनॅशनल (एनएमआयएएल) यांचे अधिकारी यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी नागरी विमान वाहतूक महासंचलनालय आणि भार...