पुणे, ता. 17 - एड्स, लोकसंख्यावाढ, कुपोषण व गुटखा याविरुद्ध जनजागरण करणाऱ्या व सेवा परम् कर्तव्यम् मानणाऱ्या चिंतन ग्रुपच्या सेवा प्रबोधिनी संस्थेतर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या 'भ्रष्टाचार व प्रतिबंधक उपाय' या ज्वलंत व धगधगत्या भ्रष्टाचार या विषयाशी निगडित निबंध स्पर्धा घेण्यात आली. पुणे विद्यापीठांतर्गत समाविष्ट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित या स्पर्धेस पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रथम पारितोषिक रु. 1111/-, द्वितीय 751/-, तृतीय 501/- व उत्तेजनार्थ 251/- व सर्वांना मानचिन्ह व प्रशस्तीपत्र येत्या 11 मार्चला पुण्यात कै. द. वि. निकम स्मृती पुरस्कार कार्यक्रमात मान्यवरांना देण्यात येणार आहे.
प्रथम क्रमांक निलेश दिलिप कोकाटे, गेणबा सोपानराव मोझे आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज, येरवडा, पुणे, द्वितीय- सौरभ वसंत उबाळे, डी. ई. एस. लॉ कॉलेज, पुणे, तृतीय- अजिंक्य अनिलराव शिंदे, मराठवाडा मित्र मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोहगाव- पुणे यांना देण्यात आला. उत्तेजनार्थ - ताई भागवत धुमसे-श्री. साईबाबा शिक्षणशास्त्र महाविद्यालय कोपरगाव, परिमल दिलिप शिंदे- बाबुरावजी घोलप महाविद्यालय, सांगवी-पुणे, सुरेंद्र तुळशीराम बनसोडे- जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालय भेडा, ता. नेवासा अहमदनगर, नानासाहेब गव्हाणे- वृत्तपत्र व संज्ञापन विभाग, रानडे इन्स्टिट्यूट डेक्कन, पुणे, चैताली मोहन साबणे- श्रीराम धामणकर कॉलेज ऑफ कॉमर्स, सायन्स, आर्ट्स, म्हसरूळ शाखा, दिंडोरी रोड नाशिक, प्रत्युषा गोविंद जाधव- गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे, मानसी माधव कंगणे- शरदचंद्र पवार इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, ओतुर-पारनेर, अहमदनगर, प्रिया देसले- श्रीमती पुष्पाबाई हिरे महिला महाविद्यालय, मालेगाव कँप, मालेगाव-नाशिक, स्मिता जयंत देंडगे- आदर्श बहुव्यापी शिक्षण व संशोधन महाविद्यालय, एरंडवणे-पुणे आणि रघुनाथ कोकाळे- मॉडर्न कॉलेज शिवाजी नगर, पुणे यांना जाहीर करण्यात आले आहे. असे अध्यक्ष आनंद थोरात यांनी कळविले आहे.