मुख्य सामग्रीवर वगळा

नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांना मूळ संचिकेची माहिती केवळ अर्जाद्वारे मिळणार

मुंबई, ता. १ - नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के योजनेअंतर्गत वाटप करण्यात येत असलेल्या भूखंडांच्या संदर्भातील मूळ संचिकेची माहिती आता केवळ अर्जाद्वारे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रकल्पग्रस्तांनी माहिती व कागदपत्रांच्या प्रती मिळवण्यासाठी भूमी व भूमापन विभागातील संबंधित नोडच्या अतिरिक्त भूमि व भूमापन अधिकारी/भूमि व भूमापन अधिकारी/सहाय्यक भूमि व भूमापन अधिकारी किंवा क्षेत्राधिकारी/ कार्यालयीन सहाय्यक, लिपीक यांचेकडे लेखी अर्ज सादर केल्यानंतर सात दिवसात माहिती उपलब्ध करून देण्यात येईल.
भूमी व भूमापन विभागाच्या अधिलेख कक्षामध्ये साडेबारा टक्के योजनेच्या संचिका ठेवण्यात आल्या आहेत. प्रकल्पग्रस्त खातेदार, त्यांचे प्रतिनिधी, विधीज्ञ व इतर व्यक्ती यांना या संचिकांची हाताळणी आवश्यकतेनुसार करण्याची अनुमती होती. परंतू अनेकदा प्रकल्पग्रस्त खातेदारांच्या संचिकेतील काही महत्वाची कागदपत्रे गहाळ होणे, मूळ संचिका गहाळ होणे अशा बाबी निदर्शनास आल्या आहेत. हे ध्यानात घेऊन, व्यवस्थापकीय संचालकांच्या सूचनेनुसार आता संचिकांच्या प्रत्यक्ष हाताळणीवर प्रतिबंध घालण्यात आला असून यापुढे खातेदार, त्यांचे प्रतिनिधी व विधीज्ञ यांना संचिकांची अभिलेख कक्षात जाऊन हाताळणी करता येणार नाही. कोणत्याही प्रकारच्या माहिती अथवा कागदपत्रांसाठी स्वतः प्रकल्पग्रस्तांना लेखी अर्ज किंवा प्रमाणित छायाचित्रासह अधिकारपत्र सादर करणे आवश्यक राहील. यानुसारच अर्ज प्राप्त झाल्यानंतर सात दिवसात मागविलेली माहिती उपलब्ध करून देण्यात येईल. अर्जदार माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये देखील अर्ज करू शकतो, असे कळविण्यात आले आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सज्जता- विमानतळ परिचालनाचा महत्त्वाचा टप्पा

 नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प स्थळाला भेट देऊन विमानतळाच्या सज्जतेचा (Readiness) आढावा घेतला.  यापूर्वी नवी मुंबई विमानतळ येथे ११ ऑक्टोबर २०२४ रोजी भारतीय हवाई दलातर्फे घेण्यात आलेली इन्स्ट्रूमेन्ट लँडिंग चाचणी आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी इंडिगोतर्फे घेण्यात आलेली प्रवासी विमान लॅंडिंग चाचणी यशस्वीरीत्या पार पडली होती. या प्रसंगी विपिन कुमार, (भा. प्र. से.) अध्यक्ष, भारतीय विमानतळ प्राधिकरण, श्री. प्रकाश निकम, प्रादेशिक संचालक, नागरी विमान वाहतूक सुरक्षा मंडळ (BCAS), श्री. विजय सिंघल, (भा. प्र. से.), उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्री. शान्तनु गोयल, (भा. प्र. से.), सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्रीमती गीता पिल्लई, मुख्य महाव्यवस्थापक (परिवहन व विमानतळ), सिडको आणि नवी मुंबई इंटरनॅशनल (एनएमआयएएल) यांचे अधिकारी यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी नागरी विमान वाहतूक महासंचलनालय आणि भार...

मार्चमध्ये पनवेल येथे चौथे राज्यव्यापी साहित्य संमेलन: कवी, गजलकारांना सहभागी होण्याचे संस्थांचे आवाहन

 पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. याकरिता सहभागी होऊ इच्छिणाऱ्या राज्यातील नामवंत कवी, गजलकारांनी आपल्या स्वरचित कविता, गजल २० फेब्रुवारीपर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन कांतीलाल प्रतिष्ठान रायगड आणि विश्वव्यापी मराठी साहित्य, सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केले आहे. अभिजात मराठी भाषेच्या जतनाकरिता गेली अनेक वर्षे दोन्ही संस्था कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली कवी संमेलने, गजल मुशायरा, चर्चासत्रांपासून मराठी भाषेचा गोडवा वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सकाळी वारकरी दिंडीतून ‘ज्ञानोबा-तुकोबा’ यांच्या गजरासह ग्रंथ दिंडीत टाळ, चिपळ्या, तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन पारंपरिक पद्धतीने नयनरम्य पालखी काढण्यात येईल. या परंपरेच्या माध्यमातून पनवेल शहराचे साहित्य, संस्कृती आणि सांस्कृतिक वारसा जतन केला जात आहे. सकाळी दिंडी, उद्घाटन सोहळा, एक-एक तासाच्या अवधीची दोन चर्चासत्रे, कवी आख्यान, गजल मुशायरा याशिवाय अन्य ...

सिडको प्रदर्शन संकुलाचे विकासकार्य प्रगतीपथावर

मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भविष्यात येथे राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांमुळे सहाय्यभूत व्यवसायांना चालना आणि रोजगार निर्मिती होऊन शहराच्या लौकिकात भर पडेल असे मत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे यांनी व्यक्त केले. येथील प्रदर्शन संकुल, पामबिच मार्गाच्या विस्तारातत समाविष्ट उड्डाण पूल आणि आंतरराष्ट्रीय राजदूतावास प्रकल्पांच्या विकास कामांची त्यांनी पाहणी केली. यावेळी मुख्य अभियंता केशव वरखेडकर, प्रकल्पांवर नियुक्त स्थापत्य, विद्युत, वास्तुशास्त्र विभागातील अभियंते व अधिकारी, वास्तुतज्ज्ञ सल्लागार, कंत्राटदार, यासह काही कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते. प्रदर्शन संकुलाचा प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा असून येथील सर्व स्थापत्य, विद्युत, वातानुकूलन, अंतर्गत सजावट या कामांच्या विकास प्रक्रियांमध्ये समाविष्ट सर्व साहित्य उत्तम प्रतीचे असावे, यात कोणतीही तडजोड करण्यात येऊ नये, मूळ काम उच्च दर्जाचे झाल्यास देखभाल दुरुस्तीवरील खर्च आटोक्यात ठेवता येऊ शकेल आणि चांगला दर्जा राखून नवीन...